Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादियानं (Ranveer Allahbadia) आई-वडिलांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. तेव्हापासूनच रणवीर अलाहाबादियासह अनेक युट्यूबर्स (YouTubers) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Social Media Influencers) टीकेची धनी झाले आहेत. रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत, त्याच्याविरोधात अनेक तक्रारीदेखील दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र सायबर विभागानं पन्नासहून अधिक सेलिब्रेटींना याप्रकरणी समन्स बजावलं आहे. 


इंडियाज गॉट लेटेंट (India's Got Latent) शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं केलेल्या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणानंतर महाराष्ट्र सायबर विभागानं पन्नासहून अधिक सेलिब्रेटींना समन्स बजावलं आहे. इंडियाज गॉट लेटंट वाद प्रकरणात आतापर्यंत पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर विभाग इंडियाज गॉट लेटेंटच्या 1 ते 6 सर्व भागांची तपासणी करत आहेत. या प्रकरणी 30 हून अधिक व्यक्तींना आरोपी करण्यात आलं आहे. राखी सावंत, समय रैनासह 50 नामवंत सेलिब्रेटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. 


रणवीर अलाहाबादियाचा फोन बंद 


मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सायबर विभागानं पन्नासहून अधिक सेलिब्रेटींना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. अशातच मुंबई पोलिसांनी रणवीर अलाहाबादियाला तिसरं समन्स बजावलं आहे. तातडीनं पोलीस स्थानकात येऊन जबाब नोंदवण्याचे निर्देश समन्समार्फत देण्यात आले आहेत. 10 मार्चपर्यंत हजर राहण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. पण, युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचा फोन बंद असल्यामुळे मुंबई पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याची माहिती समोर येत आहे. 


रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल असल्याचं समोर येत आहे. याच मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी रणवीर अलाहाबादियानं एक व्हिडीओ शेअर करुन स्पष्टीकरण दिलं होतं. रणवीरनं मी पळून गेलेलो नाही, असं सांगितलं होतं. 


समय रैनालाही पोलिसांकडून तातडीनं हजर राहण्यासाठी समन्स


कॉमेडियन समय रैनाला त्याच्या यूट्यूब शोवर केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांशी संबंधित प्रकरणातील तपासासंदर्भात 10 मार्चपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितलं आहे. पण, सध्या समय रैना अमेरिका दौऱ्यावर असल्यामुळे त्यानं ऑनलाईन जबाब नोंदवण्याची मागणी केली होती. पण, पोलिसांकडून त्याची मागणी फेटाळण्यात आली आहे.  


यांच्या डोक्यातच घाण आहे : सुप्रीम कोर्ट 


रणवीर अलाहाबादिया प्रकरणात सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं रणवीर अलाहाबादियाला फटकारलं, प्रसिद्ध असल्यानं काहीही करु शकतो असं काहींना वाटतं, असं म्हणत सुप्रीम कोर्टाकडून इंडियाज गॉट लेटेंटच्या कंटेंटवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. यांच्या डोक्यातच घाण आहे, प्रसिद्ध आहे तर काही करु शकतो असं काहींना वाटतं, या प्रकरणात आता नव्याने एफआयआर नाही, तुम्ही समाजाला हलक्यात घेऊ नका, रणवीरने त्याचा पासपोर्ट ठाणे पोलिसांत देऊन टाकावा, रणवीरसारखे लोक आपल्या आई-बापांचाही अपमान करतायत, असं म्हणत सुप्रीम कोर्टानं रणवीर अलाहाबादियाला फटकारलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....