Chhaava Box Office Collection Worldwide: विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) स्टारर 'छावा'नं (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) इतिहास रचण्याची संपूर्ण तयारी केली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

'छावा'ला फक्त जगभरातच नाहीतर संपूर्ण जगभरातून पसंती मिळत आहे. फिल्मनं जगभरात फक्त दोनच दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला होता. आता ही फिल्म वर्ल्डवाईल्ड (Worl Wild Collection) 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार आहे. 'छावा' आता वर्ल्डवाईल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. फक्त हाच नाहीतर, विक्की कौशलची 'छावा' इतरही अनेक रेकॉर्ड्स मोडण्याच्या तयारीत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा 'छावा' मध्ये दाखवण्यात आली आहे. छत्रपती शंभू राजांनी औरंगजेबाला कसं सळो की पळो करुन सोडलं, शंभू राजांनी औरंगजेबाला त्याचा दरबार सोडून महाराष्ट्रात यायला भाग पाडलं, त्यांनी औरंगजेबाच्या महाकाय सैन्याला लढा कसा दिला? हा संपूर्ण इतिहास दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'मार्फत रुपेरी पडद्यावर मांडला आहे. 'छावा'मध्ये  विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले. पण, रिलीजच्या पाच दिवसांत 'छावा'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केलं ते सविस्तर जाणून घेऊयात... 

'छावा'चं वर्ल्डवाईल्ड कलेक्शन किती? 

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'छावा'नं देशात चार दिवसांत 168.60 ग्रॉस कलेक्शन केलं आहे. फिल्मच्या कलेक्शनमध्ये सोमवारी पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच 'छावा'च्या ओव्हरसीज कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, 27 कोटींची कमाई केलीय. ज्यानंतर 'छावा'चं चार दिवसांचं वर्ल्डवाईल्ड कलेक्शन 195.60 कोटी करण्यात आलं आहे. आता फिल्म 200 कोटींचा आकडा गाठण्यापासून फक्त आणि फक्त 5 कोटींनी मागे आहे. 'छावा' पाचच दिवसांत 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. विक्की कौशलची फिल्म लवकरच रेकॉर्ड्सचे डोंगर रचताना दिसणार आहे. 

विक्की कौशलच्या 'छावा'बद्दल लोकांमध्ये असलेल्या क्रेझबाबत बोलायचं झालं तर, दिवसेंदिवस ती वाढतानाच दिसत आहे. 'छावा' पाहिल्यानंतर अनेकजण विक्कीला शंभू राजांच्याच रुपात पाहत आहेत. 'छावा'नं महाराष्ट्रात तर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंतची सर्वाधिक कमाई 'छावा'नं महाराष्ट्रात केली आहे. फिल्म पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं, तर काहींच्या अंगावर काटा आला. अनेकांना संताप अनावर झाला. 

दरम्यान, 'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सनं केलीय. सध्या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. या चित्रपटाच बॉलिवूड स्टार विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, तर अक्षय खन्ना मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत दिसून आला आहे. तर, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना हिनं साकारली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

5 Reasons To Watch Chhaava: 'छावा' का पाहावा? 'ही' 5 कारणं, म्हणून 'हा' चित्रपट पाहायलाच हवा!