एक्स्प्लोर

राणी मुखर्जीचा झाला होता गर्भपात; बाळ गमावल्यानंतर तिची अवस्था झाली होती बिकट, तिनं स्वत:ला कसं सावरलं?

Rani Mukerji Opens Up About Miscarriage: दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान राणी मुखर्जीचा गर्भपात झाला होता. तिला एका चित्रपटातून दु:खातून बाहेर पडण्यास मदत झाली होती.

Rani Mukerji Opens Up About Miscarriage: बॉलिवूड दिवा राणी मुखर्जीचा  मर्दानी 3 हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.  या चित्रपटातून राणी मुखर्जीचा फिअरलेस अवतार पाहायला मिळत आहे.  या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच होताच प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिनं आपल्या आयुष्यात बऱ्याच कठीण काळाचा सामना केलाय. राणीनं वैयक्तिक आयुष्यातही बरेच दु:ख पचवले आहेत. तिला चित्रपटातून कायम दु:खाला सामोरे जाण्यास बळ मिळाले आहे.  एकेकाळी राणीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.  तिचा दुसर्‍या प्रेग्नंसीवेळी गर्भपात झाला होता.  दरम्यान, फक्त चित्रपटामुळे तिला या संकटकाळातून बाहेर पडण्यास मदत झाली, असं अभिनेत्री सांगते.

एका मुलाखतीत राणी म्हणाली, "मी नेहमी असे चित्रपट निवडते, जे  प्रभावी असतील.  मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा चित्रपट अशावेळी माझ्याकडे आला, जेव्हा माझे वैयक्तिक नुकसान झाले होते.  2023 साली हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला". हा चित्रपट राणीकडे तेव्हा आला, जेव्हा ती तिच्या दुसर्‍या मुलाच्या गर्भपाताच्या वेदनेतून जात होती, असं राणी म्हणते. 

मुलाखतीत राणी म्हणाली, "मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाच्या स्क्रीप्टने मी खूप प्रभावित झाले होते.  या चित्रपटात एक आई आपल्या मुलापासून वेगळी होते, हे दाखवण्यात आलं आहे. त्या वेदनेशी ती कशी झुंज देते, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे". राणीच्या मते,  या भूमिकेमुळे केवळ तिचे दु:ख कमी झाले नाही, तर समाजातील खोल वास्तवही उलगडण्यास मदत झाली, असं राणी म्हणते. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rani Mukherjee (@rani_mukherjii)

मुलाशिवाय आईचे नेमके काय हाल होते. आईच्या डोळ्यादेखत मुलाला घेऊन गेल्यावर त्या महिलेची काय हालत होते, हा अनुभव या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. "एका आईची तळमळ नेमकी काय असते, हे मला या चित्रपटातून दाखवायचे होते", असं अभिनेत्री म्हणाली.

राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्रा यांना आदिरा नावाची एक मुलगी आहे.  आदिराचा जन्म 2015 साली झाला होता. राणीच्या मते, 2020 मध्ये तिच्या दुसऱ्या गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यात  तिचा गर्भपात झाला होता.  यामुळे राणीला प्रचंड धक्का बसला होता. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटातून तिला या दु:खातून बाहेर पडण्यास मदत झाली.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget