Alia Ranbir Wedding : बॉलिवूडमधील क्यूट कपल अशी ओळख असलेल्या आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्यामधील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आलियाची मैत्रिण तान्या गुप्तानं आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्यामधील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रणबीर आलियाच्या मैत्रिणींना एक खास पत्र देताना दिसत आहे.
आलियाच्या मैत्रिणींना रणबीरनं दिलेल्या पत्रामध्ये ,'मी आलियाचा पती रणबीर, ब्राइड्समेड्सला वचन देतो की...', असे लिहिलेलं दिसत आहे. तान्यानं हे फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'या दिवसांसाठी मी जगत आहे. खुप आनंद, अश्रू अशा भावना सध्या आहेत.'
16 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीरनं एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अर्जुन कपूर, मलाइका अरोरा, करण जोहर, शाहरुख खान, गौरी खान, आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया यांनी या पार्टीला हजेरी लावली होती. लवकरच आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच आलियाचे 'डार्लिंग्स' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हे आगामी चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार असून रणबीरच्या शमशेरा चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत.
हे देखील वाचा-
- Thar Trailer : अनिल कपूर आणि हर्षवर्धनच्या 'Thar' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 'या' तारखेला चित्रपट नेटफ्लिक्सवर झळकणार
- India’s Got Talent 9 Winner: लाखो रूपये, लग्झरी कार अन् ट्रॉफी ; इंडियाज गॉट टॅलेंटची विजेती जोडी दिव्यांश आणि मनुराजवर बक्षीसांचा पाऊस
- The Kashmir Files : द कश्मीर फाइल्स 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली पोस्ट