Ranbir Kapoor : संदीप वंगा रेड्डीने (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित केलेल्या अॅनिमल (Animal) या सिनेमाने बंप्पर कमाई केली. अॅनिमलबाबतच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. वादाच्या भोवऱ्यात अडकून देखील सिनेमाने देशासह विदेशातही मोठी कमाई केली आहे. सिनेमाची स्टोरी, अॅक्शनसोबतच इंटीमेट सीन्सच्याही जोरदार चर्चा रंगल्या. रणबीर कपूर आणि तृत्पी डिमरीच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. रणबीर कपूरसोबतच्या भूमिकेमुळे तृत्पी डिमरी नॅशनल क्रशदेखील बनली. दरम्यान, डिमरीसोबतच्या इंटीमेट सीनसाठी रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) पत्नी आलिया भट (Alia Bhatt) हिची परवानगी घेतली होती का? याबाबत रणबीर कपूरने मोठा खुलासा केला आहे. 


 संदीप वांगा रेड्डी याने दिग्दर्शित केलेला अॅनिमल हा सिनेमा हिट ठरलाय. अॅनिमलच्या यशामुळे सध्या रणबीर कपूर उत्साहित आहे. रणबीरने अॅनिमल सिनेमामधील इंटीमेट सीन्सबाबत भाष्य केले आहे. अॅनिमल सिनेमातील इंटीमेट सीन्ससाठी कोणत्या अडचणी आल्या याबद्दल खुद्द रणबीरनेच माहिती दिली आहे. हा सीन अभिनेता रणबीर कपूर आणि तृत्पी डिमरी यांच्यादरम्यान शूट करण्यात आला होता. एका मुलाखतीत रणबीर कपूरने याबाबत खुलासा केला आहे. वास्तविक पाहिले तर, मी या सीनबाबत फार घाबरलेलो होतो, असे रणबीर म्हणाला. 


डिमरी सोबतच्या सीनला आलीयाचे समर्थन होते?


रणबीर म्हणाला, माझ्या आणि तृत्पीमधील सीनला आलीयाचे समर्थन होते. त्यामुळेच मी पुढे जाण्याची ठरवले. रणबीरने आलीया नात्यात करत असल्याच्या साहाय्याचाही उल्लेख केला. याशिवाय, त्याने आम्ही दोघेही कामाच्या बाबतीत एकमेकांना सहाय्य करतो, असेही म्हटले आहे. अॅनिमलच्या शूटींगबाबत रणबीरने आलीयाला सांगितले होते का? या प्रश्नावर रणबीर म्हणाला, "मी आलीयासोबत इंटिमेट सीनबाबत चर्चा करत होतो. तिने अनेक सीन्सच्या शूटींगमध्ये माझी मदत केली."


आलीया रणबीरला काय म्हणाली?


रणबीर पुढे बोलताना म्हणाला की, अॅनिमलमधील सीनसाठी आणि खासकरुन मला तयार करण्यासाठी आलियाने माझी मदत केली. आलीया मला म्हणाली की, "ही एक भूमिका आहे. इंटीमेट सीन याचाच भाग आहेत." हा सिनेमा करण्यासाठी आलीयाने माझी मोठी मदत केली.  


'अॅनिमल'मुळे तृप्तीला मिळाली लोकप्रियता


तृप्ती डिमरीला अॅनिमल या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. अॅनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटामधील तृप्ती आणि रणबीरच्या इंटिमेट सीन्सची चर्चा सोशल मीडियावर झाली.  याबाबत बोलताना तृप्ती डिमरी म्हणाली होती की, "मला हा सीन शूट करताना रणबीर कपूरची मोठी मदत झाली. सीन शूट करताना त्याने माझी काळजी घेतली."


Hema Malini : मशिदीचा वाद मिटला पाहिजे, आता मथुरेतही कृष्णाचे भव्य मंदिर बनले पाहिजे : हेमा मालिनी