Hema Malini : अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर (Ram Mandir) होत आहे. ही फार आनंदाची बाब आहे. आता मथुरेतही कृष्णाचे मंदिर झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. तुम्ही मथुरा पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की, हे मंदिरांचे शहर आहे. मात्र, कृष्णाच्या जन्मस्थानी (Krushna Janmbhoomi) मशीद बांधली गेली. मथुरेत कृष्णाचे भव्य मंदिर बनले पाहिजे. मशिदीचा वाद मिटला पाहिजे. सध्या तिथे एक मंदिर आहे. ते मंदिर फार सुंदर आहे. मात्र, त्याठिकाणी आणखी एक भव्य मंदिर बांधले पाहिजे, असे मत भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी व्यक्त केलय. एका वृत्तसंस्थेशी त्यांनी अयोध्येत संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. 


मथुरेतील कृष्णजन्मभूमीचा (Krushna Janmbhoomi) मुद्दा आता पुढे येताना दिसत आहे. ज्ञानव्यापी मशिदीच्या वादाबाबत न्यायालयात सध्या सुनावणी सुरु आहे. राम जन्मभूमीनंतर कृष्णभूमीचा मुद्दा सध्या समोर येताना दिसत आहे. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दोन्ही पक्षकारांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. 


कधी बांधण्यात आली होती मशिद?


ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार, शाही ईदगाह मशिदीची निर्मिती 1670 मध्ये औरंगजेबाच्या आदेशाने करण्यात आली होती .मंदिराच्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली होती, असा दावा करण्यात येतो. या भागाला 'नजूल' असे म्हटले जाते. दरम्यान, त्यानंतरच्या काळात हा भूभाग मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. दरम्यान, नंतरच्या काळात इंग्रजांची राजवट आल्यानंतर हा भूभाग 1815 मध्ये वाराणसीचा राजा पटनीमल याने ईस्ट इंडिया कंपनीकडून आयोजित लिलावातून 13.37 एकर जमीन खरेदी केली होती. 


कृष्ण जन्मभूमी (Krushna Janmbhoomi) ट्रस्टची स्थापना 


राजा पटनीमलच्या उत्तराधिकाऱ्यांनी ही जमीन पुढे जुगल किशोर बिडला यांना विकली. पंडित मदन मोहन मालविया, गोस्वामी गणेश दत्त आणइ भिक्कन लालजी अत्रे यांचेही नाव या जमीनाला लावण्यात आले होते. दरम्यान, यानंतर कृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या जमीनीवर कटरा केशव देव मंदिरावर या ट्रस्टची मालकी आहे. या जमीनीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान सातत्याने मंदिर आणि ईदगाह मशिदीदरम्यान 1968 मध्ये झालेल्या कराराचा उल्लेख केला जातो.  हा करार म्हणजे एकप्रकारची फसवणूकच होती, असा दावा  मंदिर ट्रस्टकडून केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Raveena Tandon : कपाळावर भस्म, साडी अन् 'हर हर महादेव'चा जयघोष; रवीना टंडनने लेकीसह घेतलं सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन; पाहा व्हिडीओ