Alia Ranbir Wedding :  अभिनेत्री   आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. रिपोर्टनुसार, 17 एप्रिल रोजी हे दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. तसेच या लग्नसोहळ्याच्या तयारीला देखील सुरूवात झाली आहे. रणबीरची आई नीतू सिंह तसेच आलियाचा भाऊ राहुल भट यांनी काही दिवसांपूर्वी रणबीर आणि आलियाच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली. आता नुकतीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तनं (Sanjay Dutt) देखील याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 


संजय दत्तनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'जर रणबीर लग्न करत असेल तर मी त्याला शुभेच्छा देतो. लग्न हे एकमेकांना करण्यात आलेलं वचन आहे. त्या दोघांनी एकमेकांची साथ द्यावी आणि खुश राहावं, तसेच रणबीर तु लवकर बाबा हो आणि आनंदी राहा.' रणबीरनं 'संजू' या संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. संजय दत्तच्या भूमिकेत रणबीरला पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. 






लवकरच संजय दत्तचा केजीएफ-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये तो  अधीरा ही भूमिका साकारत आहे. तसेच आलिया आणि रणबीर यांचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


हेही वाचा :