Ramayana Fame Actress Sai Pallavi Trolled After Wearing Swimsuit: अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) आणि तिची बहीण पूजा कन्नन (Pooja Kannan) दोघी नुकत्याच सुट्टीवर गेलेल्या. दोन्ही बहि‍णींनी आपलं व्हेकेशन खूप एन्जॉय केलं. दोघींनीही आपल्या व्हेकेशनचे काही क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये साई पल्लवी आणि तिची बहीण स्विमसूट वेअर करुन बीचवर एन्जॉय करताना दिसत आहेत. पण, साई पल्लवीचे स्विमसूटमधले फोटो चाहत्यांना मात्र खटकले आहेत. सोशल मीडियावर साई पल्लवीवर जोरदार टीका केली जात आहे. तर, अनेकांनी साई पल्लवीला शिवीगाळही सुरू केली आहे.  


साई पल्लवीची बहीण पूजानं दोघींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्याला "बीच हाय #sunkissed @saipallavi.senthamarai.", असं कॅप्शन दिलं आहे. फोटो व्हायरल होताच, ट्रोलर्सनी कमेंट करायला सुरुवात केली. एका युजरनं म्हटलंय की, "...तर पडद्यावर पारंपारिक लूक कॅरी करणारी साई पल्लवी खऱ्या आयुष्यात बिकिनी घालते..." दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "यावरून ती इतर सर्व हिरोईन्ससारखीच आहे हे सिद्ध होतं... पारंपारिक कपड्यांबद्दल विसरून जा..." आणखी एका युजरनं कमेंट केली आहे की, "जर साई पल्लवी स्लीव्हलेस आणि शॉर्ट ड्रेस घालून बीचवर गेली तर कोणती हिरोईन आपल्या भारतीय संस्कृतीचे रक्षण करेल?"






काहींना साईचा पाठींबा


स्विमसूट वेअर केल्यामुळे साई पल्लवी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असून काहींनी तर आता 'रामायण'मधील तिच्या कास्टिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एकीकडे साई पल्लवीवर सडकून टीका केली जात आहे. तर, दुसरीकडे काही चाहते साई पल्लवीच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. एका युजरनं लिहिलंय की, "ही तिची चॉईस असली पाहिजे, तिला काय घालायचंय, काय नाही... आणि तसंही पाण्यात तिनं काय घालावं? अशी तुमची अपेक्षा आहे? साडी??" दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, "लोक पोहताना स्विमसूट घालतात!! लोक त्यांना जे काही घालण्यास सोयीस्कर वाटतंय, ते घालू शकतात... ही त्यांची निवड आहे... इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं थांबवा..."


साई पल्लवीचं 'रामायण'


साई पल्लवी पुढे रणबीर कपूरसोबत 'रामायण'मध्ये दिसणार आहे. अलिकडेच, निर्मात्यांनी तिचा फर्स्ट लूक शेअर केलेला आणि तो क्षणार्धात व्हायरल झाला. मोठ्या पडद्यावर सीता मातेची भूमिका साई पल्लवी साकारणार म्हणून अनेकजण खूश झालेले. 


'रामायण'चा फर्स्ट लूक 


3 जुलै, 2025 ला मेकर्सनी 'रामायण: द इंट्रोडक्शन'च्या लॉन्च केलं. ज्यामध्ये पौराणिक कथांमधील दोन सर्वात प्रतिष्ठित शक्ती: राम आणि रावण यांचा समावेश होता. हा लाँच जागतिक स्तरावर झाला, ज्यामध्ये नऊ भारतीय शहरांमध्ये चाहत्यांसाठी स्क्रीनिंग आणि न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये एक नेत्रदीपक बिलबोर्ड टेकओव्हरचा समावेश होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Marathi Actor In Riteish Deshmukhs Raja Shivaji Movie: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार मराठी मालिकाविश्वातील 'हा' अभिनेता; पोस्ट शेअर करत म्हणाला...