Horoscope Today 22 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 23 सप्टेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या बाबतीत लोकांचे गैरसमज फार पटकन होतील, म्हणून त्याबाबतीत तुम्हाला सावध राहिले पाहिजे

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करायचे आहे, त्यांना आजचा दिवस चांगला आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल, भावंडांचे सहकार्य ही मिळेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या करिअरमध्ये योग्य संधी मिळण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील, संघर्षाला सामोरे ही जावे लागेल

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज विलंबाने गोष्टी होतील पण धीर सोडायचे कारण नाही, नवीन जबाबदाऱ्या अंगावर घेताना सर्वांगीण विचार करावा

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज राजकारणात असलेल्या व्यक्तींना जनमानसासमोर आपली प्रतिमा चांगली निर्माण करावी लागेल, विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवणे आवश्यक

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील अन मोठेपणा आज इतरांना थोडा जास्त होईल, परंतु तुमच्या स्वभावानुसार समोरच्याला बोलायचे धाडस होणार नाही

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कोणतेही काम करताना तुमचा अहंकार पदोपदी इतरांना जाणवेल, दुसऱ्याच्या मताशी तुम्ही सहज सहमत होणार नाही

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज शब्द हे शस्त्र आहे त्याची जाणीव ठेवावी लागेल, मानसिक अस्थिरता ही आज जाणवणार आहे

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या इष्ट देवतेची उपासना केल्यास फायद्याचे ठरेल, तुमच्या चौकस स्वभावामुळे अनेक ठिकाणच्या बातम्या मिळवाल

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कलाकारांच्या जीवनात स्फूर्तीदायक घटना घडतील. अभ्यास करणाऱ्यांना पोषक ग्रहमान

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो लेखकांना परखडलेखन करण्यासाठी काळ चांगला आहे आत्ता जे लेखन कराल त्याला प्रसिद्धी मिळेल.

हेही वाचा :           

Shardiya Navratri 2025: देवीचं आगमन जबरदस्त महाशुभ योगात! नवरात्रीत 'या' 4 राशींच्या लोकांचे बॅंक-बॅलेन्स वाढणार, देवी कृपेने बक्कळ पैसा यायला सुरूवात..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)