ramaiya vastavaiya fame girish kumar : बॉलिवूडमध्ये अनेक असे स्टार्स आहेत ज्यांनी सुपरहिट चित्रपटांमधून इंडस्ट्रीमध्ये दमदार प्रवेश केला. मात्र, स्टारडम टिकवू न शकल्यामुळे ते मोठ्या पडद्यावरून अदृश्य झाले. आज आपण अशाच एका अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत, ज्याने केवळ 3 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडला अलविदा केला. पण हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज तो आमिर खानसारख्या सुपरस्टारपेक्षाही जास्त श्रीमंत आहे. जाणून घ्या त्याचं नाव…
फक्त तीन चित्रपट करून बॉलिवूडला रामराम
खरं तर आपण बोलत आहोत 2013 मध्ये आलेल्या ‘रमैया वस्तावैया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या गिरीश कुमार विषयी. पहिल्याच चित्रपटात त्याच्या चार्ममुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे अनेकांना वाटलं की गिरीश भविष्यात सुपरस्टार बनेल. पण तसं काही झालं नाही. कारण त्याने फक्त तीन चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यानंतर बॉलिवूड सोडून दिलं.
गिरीश सध्या काय करतो?
खूप कमी लोकांना माहिती आहे की गिरीश कुमार हा प्रसिद्ध निर्माता कुमार एस. तौरानी यांचा मुलगा आहे, ज्यांनी टिप्स इंडस्ट्रीजची स्थापना केली. गिरीशचा पहिला चित्रपट त्यांच्याच बॅनरखाली बनवण्यात आला होता. मात्र, गिरीशने लवकरच अभिनय क्षेत्रातून माघार घेतली. सध्या तो टिप्स इंडस्ट्रीज कंपनी सांभाळतो. तो त्या कंपनीचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (CEO) आहे आणि त्यातूनही त्याची मोठी कमाई होते.
गिरीश कुमारची एकूण संपत्ती किती आहे?
गिरीश कुमारच्या कमाईबद्दल बोलायचं झालं, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माहितीनुसार त्याची कंपनी टिप्स इंडस्ट्रीजची एकूण किंमत सुमारे 8,500 कोटी रुपये आहे. तर गिरीश कुमारची स्वतःची नेटवर्थ जवळपास 2,164 कोटी रुपये आहे. हे लक्षात घ्या की गिरीश अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्सपेक्षाही जास्त श्रीमंत आहे. उदाहरणार्थ, आमिर खान यांची एकूण संपत्ती अंदाजे 1,900 कोटी रुपये आहे आणि रणबीर कपूरची संपत्ती सुमारे 400 कोटी रुपये आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या