Dharashiv : सिरेंटिका पवनचक्की (Sirentika Windmill) कंपनीच्या ठेकेदाराकडून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तब्बल 45 लाखांची फसवणूक झाली आहे. शेतात टॉवर उभे केल्याचा मावेजा शेतकऱ्यांना (Farmers) चेक द्वारे दिला पण 15 ते 20 दिवस होऊनही बँकेत चेक वटत नसल्याचे समोर आले आहे. पवनचक्की कंपनीच्या ठेकेदारांनी चेक होल्ड करत फसवणूक केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. वाशी तालुक्यातील पारा गावातील 15 शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. जमिनीचा मोबदला म्हणून ज्यांनी चेक दिला ते ठेकेदार  फोनही उचलत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

12 ते 15 शेतकऱ्यांचे जवळपास 45 लाख किमतीचे चेक बाउन्स 

धाराशिव (Dharashiv )जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील पारा गावात पवनचक्की कंपनीकडून शेतकऱ्यांना दिलेली चेक बँकेत वटले नाही. 12 ते 15 शेतकऱ्यांचे जवळपास 45 लाख किमतीचे चेक बाउन्स झालेत. त्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. सिरेंटिका कंपनीचे टॉवर शेतकऱ्यांच्या शेतात उभारले गेले. मात्र कंपनीच्या ठेकेदारांकडून मोबदला म्हणून दिलेली चेक वाटले नाहीत. त्याबाबत ठेकेदारांशी संपर्क साधायचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्यावर ते फोनही घेत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. आपली फसवणूक झाली असून आपल्याला न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची पवनचक्कीविरोधात प्रचंड घोषणाबाजी

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची पवनचक्कीविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली आहे. तांदुळवाडी येथील पवनचक्की बाधित शेतकरी कुटुंबातील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिल्याचे पाहायला मिळाले. 6 दिवसांपासून वाशी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. पवनचक्की कंपन्यांच्या ठेकेदारांकडून लूट होत असल्याचा आरोप करत उपोषण सुरु केले आहे. सहा शेतकऱ्यांची तब्येत खालवली मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक घेतली. पवनचक्कींच्या ठेकेदारांकडून होणाऱ्या अन्याय दूर करत न्यायाची मागणी केली आहे. 

शेतकऱ्यांची नावे आणि चेकवरील रक्कम 

1) लहू चत्रभुज शिनगारे -05-लाख 2) सुजित जगन्नाथ पवार -06- लाख 3) गवळी महेंद्र बाबासाहेब -1500004) लक्ष्मण मारुती गवळी -1500005) प्रतिभा कृष्णानंद नंद -3500006) तुकाराम दत्तू पवार- 2000007) अण्णा नामदेव घुले - चेकच दिला नाही 8) लक्ष्मीबाई अंबादास घुले -1000009) सुरेश सोपान गोडसे -10000010) रामभाऊ सोपान गोडसे -14 लाख 11) छोटू अंबादास घुले -10000012) संदीप चंद्रकांत कदम -चेकच दिला नाही 13) सुनिता दत्तू उंद्रे -19- लाख 14) शामराव घुले - 10000015) सखाराम मोहन गोडसे - 350000

महत्वाच्या बातम्या:

Beed Crime : मोठी बातमी : बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार, पोलिसांची घटनास्थळी धाव