ram gopal verma and manoj bajpayee : सुमारे 27 वर्षांपूर्वी सत्या सारखी अविस्मरणीय सिनेमाचे दिग्दर्शन करणारे राम गोपाल वर्मा आणि मनोज बाजपेयी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. यावेळी हे दोघे मिळून एक भन्नाट हॉरर-कॉमेडी तयार करत आहेत – “पुलिस स्टेशन में भूत”.. या चित्रपटात मनोजसोबत जेनेलिया डिसूझा देखील झळकणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून पहिला शेड्यूल पूर्णही झाला आहे. या कथेची गंमत अशी आहे की आपण घाबरलो तर पोलीस स्टेशनमध्ये जातो, पण जेव्हा पोलीसच घाबरले तर ते कुठे जाणार? हाच या सिनेमाचा ट्विस्ट आहे.
मनोजसोबत पुन्हा काम करणे माझ्यासाठी खूप खास - राम गोपाल वर्मा
राम गोपाल वर्मा म्हणाले, “मनोजसोबत पुन्हा काम करणे माझ्यासाठी खूप खास आहे. भीती तेव्हाच अधिक भयानक होते जेव्हा ती सुरक्षेच्या प्रतीकाला आव्हान देते. मनोजची अभिनयकला आणि जेनेलियाची निरागसता ही कथा अधिक परिणामकारक बनवेल.”
बाजपेयी आणि राम गोपाल वर्मांचं तीनसिनेमात एकत्रित काम
मनोज बाजपेयीने राम गोपाल वर्मा दिग्दर्शित तीन चित्रपटांत काम केले आहे – सत्या व्यतिरिक्त कौन आणि सरकार 3 यांचा समावेश होतो. तर निर्मितीच्या दृष्टीने पाहता, मनोजने शूल आणि रोड या चित्रपटांतही काम केले आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन राम गोपाल वर्माने केले नव्हते, ते फक्त निर्माते होते.
मनोजच्या अलीकडच्या चित्रपटांच्या यादीकडे पाहिल्यास असे वाटते की त्यांनी पुन्हा एकदा कॉमेडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांचा इन्स्पेक्टर झेंडे प्रदर्शित झाला असून आता पोलीस स्टेशनमध्ये भूतची घोषणा झाली आहे. याआधीही मनोजने सूरज पे मंगल भारी आणि सात उचक्के सारख्या कॉमेडी चित्रपटांत काम केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या