Sunny Leone On Twins Surrogate: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) सनी लियोनीच्या (Sunny Leone) बोल्डनेस आणि ग्लॅमरस अदांचे सारेच दिवाने आहेत. सौंदर्याची खाण असलेली सनी लियोनी तीन मुलांची आई आहे. मुलगी निशा हिला सनी लियोनीनं दत्तक घेतलं आहे. तर, तिची जुळी मुलं नोहा आणि आशेर यांचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. 

अलिकडेच, सनी लिओनीनं तिच्या सरोगसीच्या अनुभवाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, जी महिला माझ्या मुलांची सरोगेट आई होती, तिनं माझ्याकडून खूप मोठी रक्कम घेतली होती. त्या पैशांत तिनं स्वतःचं घर बांधलं आणि तिच्या लग्नाचा खर्चही उचलला. सनी लियोनीनं सोहा अली खानच्या 'ऑल अबाउट हर' या पॉडकास्टमध्ये बोलताना सरोगसीबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या पॉडकास्टचा ट्रेलर सोहा अली खाननं गुरुवारी पोस्ट केला होता, ज्यामध्ये सनी तिच्या आयुष्याबद्दल मनमोकळेपणानं बोलताना दिसली.

व्हिडिओच्या सुरुवातीलाच सोहा अली खान म्हणते की, "आजचा भाग प्रत्यक्षात पालक होण्याचे वेगवेगळे मार्ग जाणून घेण्याबद्दल आहे...", त्यानंतर सनी लियोनी म्हणाली, "माझ्या मनात एक मूल दत्तक घेण्याबाबत विचार आला होता..." भारतातील आघाडीच्या स्त्रीरोगतज्ज्ञांपैकी एक असलेल्या किरण कोएल्हो देखील महिलांच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी त्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या. 

IVF वर काय म्हणाली सनी लियोनी? 

ट्रेलरमध्ये सनी एका बाळाला दत्तक घेण्याच्या तिच्या प्रवासाबद्दल सांगते आणि म्हणते, "आम्ही दत्तक घेण्यासाठी अर्ज केला आणि ज्या दिवशी आयव्हीएफ झालं, त्याच दिवशी आम्हाला मुलगी मिळाली..." पुढे बोलताना सोहाने सनीला विचारलं की, तिनं सरोगसीचा निर्णय जाणूनबुजून घेतला का? कारण तिला आई व्हायचं नव्हतं... सनी लियोनी म्हणाली की, "मी तसं केलं नाही..."

सरोगसीसाठी सनी लियोनीनं किती पैसे दिले? 

सोहा अली खाननं सनीला सरोगसीसाठी आलेल्या खर्चाबाबत विचारलं. यावर सनी लियोनी म्हणाली की, "आम्ही आठवड्याचे शुल्क भरत होतो. तिच्या पतीला सुट्ट्यांसाठीही पैसे मिळत होते. म्हणून, त्याला त्यासाठी पैसे मिळत होते. म्हणजे, आम्ही खूप पैसे दिले. त्यांनी एक घर विकत घेतले आणि त्यांचे लग्नही खूप भव्य होते..." 

सनी लियोनी, डेनियल वेबरचं लग्न 

सनी लिओन आणि डॅनियल वेबर यांचे 2011 मध्ये लग्न झालं. या जोडप्याला तीन मुले आहेत, मुलगी निशा, जिला 2017 मध्ये दत्तक घेण्यात आलं होतं आणि जुळी मुलं नोहा आणि आशेर, ज्यांचा जन्म 2018 मध्ये सरोगसीद्वारे झाला होता.