Singer Rahul Deshpande divorce with Neha Deshpande : प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी वैवाहिक आयुष्याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून जाहीर केलाय. लग्नाला तब्बल 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर राहुल आणि नेहा देशपांडे यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.  घटस्फोटाबाबतची माहिती स्वतः राहुल देशपांडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली. पोस्टमध्ये त्यांनी नेहासोबतचे 17 वर्षांचे सहजीवन अनेक सुंदर आठवणींनी भरलेले असल्याचे नमूद केले असून आता दोघेही स्वतंत्रपणे आपले आयुष्य पुढे नेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल आणि नेहा यांचा घटस्फोट सप्टेंबर 2024 मध्ये कायदेशीररीत्या पूर्ण झाला असून, हा निर्णय दोघांच्या परस्पर सहमतीने घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुल आणि नेहा यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल देशपांडे यांची पोस्ट जसीच्या तशी 

प्रिय मित्रांनो,

तुम्हा प्रत्येकाने माझ्या प्रवासात आपल्या आपल्या पद्धतीने एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाची अपडेट शेअर करायची आहे. तुमच्यापैकी काहींना मी हे आधीच शेअर केले आहे. लग्न होऊन 17 वर्षे झाल्यानंतर आणि असंख्य गोड आठवणींनंतर, नेहा आणि मी परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत आणि स्वतंत्रपणे आपले जीवन जगत आहोत. सप्टेंबर 2024 मध्ये आमचे कायदेशीर विभक्त होणे शांततेत आणि परस्पर समजुतीने पूर्ण झाले.

ही अपडेट शेअर करण्याआधी मला थोडा वेळ घ्यावा असे वाटले, जेणेकरून हा बदल मी खासगीपणे स्वीकारू शकेन आणि सर्व काही काळजीपूर्वक हाताळले जाईल. विशेषतः आमची मुलगी रेनुकाच्या सर्वोत्तम हितासाठी. तिचं माझं सर्वोच्च प्राधान्य आहे. माझी मुलगी रेनुका हिच्यासाठी मी नेहमी नेहासोबत प्रेम, साथ आणि स्थैर्याने सहपालन करण्यास वचनबद्ध आहे. ही आमच्यासाठी स्वतंत्र व्यक्ती म्हणून एका नव्या अध्यायाची सुरुवात असली तरी, पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर कायम मजबूत राहील. या काळात आमच्या निर्णयाचा आणि गोपनीयतेचा सन्मान केल्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे.

प्रेम आणि कृतज्ञतेसह,राहुल

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुख्य पात्र अर्ध्यावरच मरतं, सस्पेन्स कॅटेगिरीतील 'बाप' आहे सायको सिनेमा; धडकी भरवणारं म्युझिक

Mahavtar Narsimha: महावतार नरसिम्हाची क्रेझ अजूनही कायम; 200 कोटी कमावण्यापासून एक पाऊल दूर