Sonali Kulkrani On Raj Thackeray, Uddhav Thackeray: मराठी सिनेसृष्टीमधील (Marathi Industry) आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीनं (Sonali Kulkrani) तिचं स्थान निर्माण केलं आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांसह (Marathi Movie) हिंदी चित्रपटांमध्येही (Hindi Films) काम केलं आहे. त्यासोबतच सोनाली कुलकर्णीनं मल्ल्याळम फिल्ममध्येही काम केलं आहे. पण, यावेळी सोनाली तिच्या सिनेमामुळे किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत नाही. तर, सोनालीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याबाबत भाष्य केलं आहे.  

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रत्येकाचं लक्ष लागलं आहे, ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याकडे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दोन्ही भावांमधल्या भेटीगाठी गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. नुकतंच गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरेंचं कुटुंब राज ठाकरेंच्या घरी गेलं होतं. सुरुवातीला मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती करणार असल्याचं बऱ्याच दिवसांपासून बोललं जात आहे. अशातच आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं वक्तव्य केलं आहे. 

सोनाली कुलर्णी काय म्हणाली? 

'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सोनाली कुलकर्णीला ठाकरे बंधू एकत्र आलेत, हे कायमस्वरुपी एकत्रच दिसावे असं वाटतंय? असं विचारलं गेलं. त्यावर बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "हे खूपच हायपोथेटिकल आहे. त्यामुळे आता काहीच सांगू शकत नाही. जोपर्यंत ठाकरे बंधू औपचारिक घोषणा करत नाहीत तोपर्यंत या अफवा, चर्चा यावर नक्की विश्वास ठेवावा हे प्रश्नार्थी आहे. पण, महाराष्ट्राच्या संस्कृती, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीसाठी हे चांगलं असेल तर हे नक्कीच व्हावं आणि कायमस्वरुपी व्हावं".

दरम्यान, सोनाली कुलकर्णीनं 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. त्यानंतर तिनं अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत. तसेच सोनालीनं हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिची मोहोर उमटवली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actor Shreyas Raje On Ganeshotsav 2025: 'नाव शोएब.. पण गणेशोत्सवाबद्दलचा आदर खऱ्याहून खरा...", मराठमोळ्या अभिनेत्याची समाजाला आरसा दाखवणारी पोस्ट