Niharika Konidela Divorce : बाॅलीवूड (Bollywood) असू देत किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्री आजकाल मोठ्या प्रमाणात घटस्फोट होताना दिसत आहे. अनेक सेलेब्रिटी (Celebrity) त्यांच्या सोशल मीडियावर घटस्फोट (Divorce) घेत असल्याचे सांगून मोकळे होतात. अशातच काही दिवसांपूर्वी राम चरणची (Ram Charan) चुलत बहिण निहारीकाच्या घटस्फोटाची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र याच चर्चेला दुजोरा देत निहारीकाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाविषयी सांगितले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या अनेक बातम्या येत होत्या. लग्नाच्या तीन वर्षानंतर निहारीका आणि तिचा पती चैतन्य जोनलगड्डा या दोघांनी मिळून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. निहारिकाच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहते चकीत झाले आहेत. निहारिका ही मेगास्टार चिरंजीवी यांची पुतणी आहे. निहारिका कोनिडेलानं हैद्राबाद कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेत निहारिकानं न्यायाधीश यांना विनंती केली होती की, तिला तिचा पती चैतन्य जोनलगड्डाकडून घटस्फोट हवा आहे.
काय आहे निहारीकाची पोस्ट
'चैतन्य आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघं आमच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जात असताना तुम्ही सहानुभूती दर्शवावी अशी अपेक्षा करतो. माझा पाठिशी खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल मी कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांचे आभार मानते. आयुष्यातील या नव्या बदलाला सामोरं जाताना मी तुम्ही माझ्या खासगी आयुष्याचा आदर कराल अशी अपेक्षा करते’, अशी पोस्ट निहारिकाने तिच्या इंस्टाग्रामला शेअर केली आहे.
निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोनलगड्डा यांनी डिसेंबर 2020 मध्ये शाही विवाह केला होता. तर लग्नाच्या दोन वर्षांनंतर आता त्या दोघांमध्ये वाद वाढू लागले होते. त्यांना हे जाणवलं की ते दोघे एकाच घरात राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. निहारिकानं एप्रिल महिन्यात चैतन्यसोबतचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट करून टाकले होते. तेव्हा पासूनच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर काय तर निहारिका तिच्या भावाच्या साखरपुड्यातही एकटी दिसली होती. त्यामुळे या चर्चा अजून जास्त सुरु झाल्या होत्या आणि अनेकांनी म्हटले की, त्यांचा घटस्फोट झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या