Kedar Shinde On Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांसह सेलिब्रिटींकडून या सिनेमाचं कौतुक होत आहे. प्रेक्षकांनी कौतुक केलेल्या या सिनेमाचं आता दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Kedar Shinde) कौतुक केलं आहे. 


केदार शिंदेंची पोस्ट काय आहे? (Kedar Shinde Post)


केदार शिंदे यांनी लिहिलं आहे,"ही स्वामींची कृपा. हा सिद्धीविनायकाचा महाप्रसाद. मला 21 वर्ष लागली दादरता एक रस्ता क्रॉस करायला. 2002 साली 'सही रे सही' आलं. त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे हाऊसफुल्लचे बोर्ड पाहातो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमांनाही भरभरुन प्रतिसाद दिलात". 






केदार शिंदेंनी पुढे लिहिलं आहे,"अगं बाई अरेच्चा', 'जत्रा' ते 'महाराष्ट्र शाहीर'पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱ्या अर्थाने 'सही'नंतर 'बाईपण भारी देवा'चं यश पाहातो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन, तुम्ही मात्र सोबत राहा. खूप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन". 


केदार शिंदेंच्या पोस्टवर महिलावर्गाच्या सर्वाधिक कमेंट्स


केदार शिंदे यांच्या पोस्टवर सर्वाधिक कमेंट्स या महिला चाहत्यांनी केल्या आहेत. उत्तम दिग्दर्शन, चपखल संवाद लेखन, प्रसंगाला बळकटी देणारी गाण्याची निवड आणि अर्थात अभिनय जगणाऱ्या सहा अभिनेत्री या सगळ्याचा संगम म्हणजे 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा आहे, संपूर्ण कुटुंबासह हा सिनेमा पाहिला, एकनंबर सिनेमा, महिलावर्गासह पुरुष मंडळींनी पाहावा असा चित्रपट, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा'चा बोलबाला


'बाईपण भारी देवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 1.3 कोटींची कमाई केली आहे. दुसरा दिवस 2.45 कोटी, तिसरा दिवस  3.3 कोटी, चौथा दिवस 1.20 कोटी आणि पाचव्या दिवशी 1.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 9.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'बाईपण भारी देवा'मुळे मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. 


संंबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : बॉलिवूडला भिडल्या 'त्या' सहाजणी; 'बाईपण भारी देवा'ने पाच दिवसांतच जमवला 9.75 कोटींचा गल्ला