Kajol On Paparazzi : अभिनेत्री काजोल (Kajol) गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान काजोलला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहे. नुकत्याच एका मुलाखतीत काजोलला तिची मुलगी निसाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला काजोलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
काय म्हणाली काजोल?
काजोलची मुलगी निसा ही स्टारकीड असल्याने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. पापाराझी अनेक वेळा निसाचे फोटो काढतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे अनेकवेळा निसाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. निसा आणि पापाराझी यांच्याबाबत एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आल्यानंतर काजोल म्हणली, 'पापाराझींना कसे सामोरे जायचे हे मी तिला शिकवू शकत नाही, तिने ही गोष्ट अनुभवातून शिकली आहे. तिने जयपूरमध्ये पहिल्यांदा पापाराझीचा अनुभव घेतला होता. आम्ही दोघे तिथे होतो आणि आमच्यासोबत सिक्युरिटी म्हणून कोणी नव्हते. त्यानंतर 20-25 फोटोग्राफर्सनं आम्हाला घेरलं आणि आरडाओरडा सुरू केला, तो पाहून निसा घाबरली आणि ढसाढसा रडू लागली. मी तिला माझ्या जवळ घेतले आणि सरळ गाडीमध्ये गेले.'
पुढे काजोल म्हणाली,' निसा ही पापाराझींना खूप चांगल्या प्रकारे हँडल करते. ती माझ्यापेक्षा खूप सभ्यतेने आणि सन्मानाने पापाराझींशी वागते. तिच्या जागी जर मी असते तर मी माझी चप्पल कधीच काढली असती.' काजोलच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
काजोलचा लस्ट स्टोरी-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झाला. काजोलसोबतच तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia), विजय वर्मा, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता (Neena Gupta) या कलाकारांनी देखील लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. आता लवकरच काजोलचा दो पत्ती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्माती क्रिती सेनन आहे. तसेच काजोलच्या त्रिभंगा, सलाम वेंकी या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Kriti Sanon: क्रिती सेनन झाली निर्माती; 'दो पत्ती'ची केली घोषणा, 8 वर्षानंतर काजोलसोबत करणार काम