Ram Charan Teja Total Income : साऊथ सुपरस्टार राम चरण तेजा (Ram Charan Teja) हा शानदार अभिनयाबरोबरच त्याच्या लग्जरी लाईफस्टाईलसाठी सुद्धा विशेष ओळखला जातो. राम चरण तेजाचा चाहतावर्ग हा फक्त साऊथ इंडस्ट्रीतच नाही तर संपूर्ण देशात त्याची फॅन फॉलोईंग आहे. साऊथ चित्रपटांचे लीजेंड सुपरस्टार चिरंजीवी यांचा पुत्र राम चरण याने चित्रपटसृष्टीत मोठे नाव मिळवले आहे. राम चरण तेजा इंडस्ट्रीतल्या सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. 


राम चरण तेजा फक्त चित्रपटांतूनच कमावतो असं नाही. तर, त्याच्याकडे स्वत:ची एअरलाईन कंपनीसुद्धा आहे. टर्बो मेघा एयरवेज प्राइवेट लिमिटेड हैदराबादच्या पुढे एक प्रादेशिक विमान सेवा आहे. राम चरण हा  एका पोलो क्लबचादेखील मालक आहे. त्याचप्रमाणे रामला लहानपणापासूनच घोड्यांशीही लगाव आहे. 


मीडिया रिपोट्सनुसार राम चरण एका महिन्यात 4 कोटींहून अधिक कमाई करतो. राम चरणकडे अनेक लग्जरी गाड्या आहेत. एस्टन मार्टिन, रॉल्स रॉयस फॅंटम, मर्सिडीज जीएल 350 यांसारख्या अनेक मोठमोठ्या गाड्या आहेत. 
  
साऊथ सुपरस्टार राम चरण तेजाचा हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये 25 हजार स्क्वेअर फुटाचा अलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत साधारण 30 करोड रूपये इतकी आहे. राम चरणचे हैदराबादचे अलिशान घर राजवाड्याहून काही कमी नाही. या ठिकाणी अनेक सुख-सुविधांसह स्विमिंग पूल, जिम आणि टेनिस कोर्टसुद्धा आहे. एवढेच नाही तर राम चरणचे मुंबईत सुद्धा अलिशान पेंट हाऊस आहे. मुंबईत राम चरण हा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा शेजारी आहे. राम चरण याने अनेक प्रकारच्या ब्रँडमध्ये गुंतवणूकदेखील केली आहे, ज्यामधून त्याला रॉयल्टी मिळते.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha