Game Changer Movie : तमिळ सिनेसृष्टीत रोबोट, अपरिचित, नायक यांसारखे चित्रपट देणारे दिग्दर्शिक एस. शंकर पुन्हा एकदा एक नवा सिनेमा घेऊन आले आहेत. एस. शंकर यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. तसेच बॉक्स ऑफिसवरही त्यांच्या चित्रपटांनी मोठी कमाई देखील केलीये. याचदरम्यान फेब्रुवारी 2021 मध्ये एस. शंकर त्यांचा तेलुगु सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आहे. तसेच या चित्रपटात राम चरण (Ram Charan) मुख्य भूमिकेत असणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. त्यानंतर गेम चेंजर (Game Changer) असं या चित्रपटाचं अधिकृत नाव घोषित करण्यात आलं.


त्यानंतर गेम चेंजर असं या चित्रपटाचं अधिकृत नाव घोषित करण्यात आलं. पण 2021 मध्ये घोषणा झाल्यानंतरही अजूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाहीये. 250 कोटींमध्ये बनवल्या जाणाऱ्या चित्रपटाचं बजेट एवढं वाढलं कसं की निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरली? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. दरम्यान या चित्रपटातील एका 7 मिनिटाच्या अॅक्शन सीनवर तब्बल 70 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. 


चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार?


दरम्यान या चित्रपटाची गोष्टीविषयी अद्याप कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलं नाहीये. पण मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात राम चरणचा डबल रोल असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात कियारा अडवाणी देखील झळकरणार असल्याचं समोर आलं होतं. पण अद्यापही या चित्रपटाला प्रदर्शनाचा मुहूर्त लागला नाहीये. त्यातच आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीये. 






7 मिनिटांच्या अॅक्शन सिनसाठी 70 कोटींचा खर्च


गेम चेंजर या चित्रपटात राम चरणच्या अॅक्शनसीनची देखील चर्चा आहे. या सीनचे जवळपास 20 दिवस हैदराबादला शुटींग सुरु होते. त्याचप्रमाणे जवळपास 7 मिनिटांच्या सीनसाठी 70 कोटींचा खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. 


फक्त गाण्यांवरच केला 50 कोटींचा खर्च


‘गेम चेंजर’ या चित्रपटामध्ये एकूण 5 गाणी असणार आहेत. तसेच या चित्रपटातील गाणी बनवण्यात कोणत्याही प्रकारची कसर राहू नये अशी निर्मात्यांची इच्छा होती. यासाठी प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळे कोरिओग्राफर निवडले गेले.  गणेश आचार्य, जानी मास्टर आणि प्रभुदेवा यांनीही या चित्रपटासाठी गाणी कोरिओग्राफ केली आहेत. या चित्रपटातील फक्त एका गाण्यावर 15 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.  या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केलीये. 


ही बातमी वाचा : 


Hemant Dhome Birthday : 'हॅप्पी बर्थडे पाटील...', हेमंतला क्षितीकडून मिळाल्या खास शुभेच्छा, पण काय आहे 'पाटील' आणि 'पाटलीणबाई' नावामागचा किस्सा?