Hemant Dhome Birthday Post by Kshitee Jog : 'बघतोस काय मुजरा कर' (Baghtos Kay Mujra Kar), सनी (Sunny), झिम्मा (Jhimma), झिम्मा -2 (Jhimma 2) यासांरख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या या वाढदिवसानिमित्ताने त्याची बायको आणि अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग (Kshitee Jog) हिने हेमंतला खास शुभेच्या दिल्यात. दरम्यान नुकतच हेमंतने दिग्दर्शित केलेला झिम्मा -2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंतने केलं होतं तर निर्माती ही क्षिती होती. क्षिती आणि हेमंत त्यांच्या इन्स्टाग्रामवरील पाटील आणि पाटलीणबाई या त्यांच्या नावामुळे विशेष चर्चेत असतात. 


हेमंतला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने कलाकार मंडळींनी देखील हेमंतला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच क्षितीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हेमंतसोबत फोटो शेअर केलाय. या फोटोला तिने  #Happypatil असं कॅप्शन दिलंय. त्यांच्या या कॅप्शनची कायमच चर्चा असते. पण यामगचा नेमका किस्सा हेमंतने एका मुलाखतीदरम्यान सांगितला आहे. 


क्षितीने पोस्टमध्ये काय म्हटलं?


क्षितीने तिच्या पोस्टमध्ये हेमंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, स्वप्न पाहत राहा, कष्ट करत राहा, हसत राहा असं म्हणत #Happypatil देखील म्हटलं आहे. तिच्या या पाटीलची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलीये. क्षितीच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी देखील हेमंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.






काय आहे पाटील आणि पाटलीणबाईचा किस्सा?


हेमंत आणि क्षिती त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये कायम पाटील आणि पाटलीणबाई असा उल्लेख करतात. पण त्याच्या या नावामागे नेमका किस्सा काय आहे, याची उत्सुकता अनेकांना आहे. हेमंतने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा शेअर केलाय. त्यानं म्हटलं की, आमचं मूळ नाव ढोमे-पाटील असं आहे. माझे नातेवाईक हेच नाव लावतात. पण माझे वडिल पोलिसांत असल्याने त्यांनी पाटील कधी लावलं नाही आणि मग मीही ते लावलं नाही. आमचं लग्न झालं तेव्हा क्षितीने मला म्हटलं की, माझ्या नवऱ्याचं आडनाव मला असं मोठं हवं होतं. त्यावेळी मी तिला सांगितलं की आमचं आडनाव ढोमे-पाटील असं आहे. त्यामुळे आजपासून तुही पाटील झालीस. तेव्हापासून मी तिला पाटलीणबाई म्हणतो आणि ती मला पाटील म्हणते. 


ही बातमी वाचा : 


Lakshmichya Pavalani : अखेर अद्वैतसमोर आली नयना, कला शोधून काढणार सगळ्यामागचा खरा चेहरा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सत्य येणार का चांदेकरांसमोर?