एक्स्प्लोर

'मला बाळ हवंय, तू स्पर्म डोनेट कर..' राखीची राकेश बापटकडे अजब मागणी, म्हणाली 'माझं एकतर्फी प्रेम असलं तरी..'

Rakhi Sawants One-Sided Love for Raqesh: एलिमिनेट झाल्यानंतर राखीने राकेशवर एकतर्फी प्रेम असल्याची कबूली दिली.

Rakhi Sawant One Sided Love Story Raqesh Bapat: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. ग्रँड फिनालेला काही दिवस उरले आहेत. सध्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. राखी सावंतला बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या कमी मतांमुळे ती एलिमिनेट झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच तिने राकेश बापटला व्होट करा, असं जनतेला आवाहन केलंय.   बिग बॉसच्या घरात असताना  राखी आणि राकेशमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती.  दरम्यान, शोमध्ये अनेकदा राखीने, 'राकेशवर माझं प्रेम आहे', असं म्हटलं आहे.  राखीने बऱ्याचदा आपल्या प्रेमाची कबुली दिली. आता घराबाहेर आल्यानंतरही राखी राकेश बापटबद्दल बोलताना दिसत आहे. राखी सध्या विविध माध्यमांना मुलाखती देत आहे. नुकतंच दिलेल्या मुलाखतीत  राखीने राकेशकडे मोठी आणि अजब मागणी केली आहे.  

अलिकडेच महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणते,  'राकेश बापटसोबत आधी खूप  भांडले. तसंच असतं ना, आधी कपलमध्ये भांडणं होतात, नंतर प्रेम वाढतं. आम्ही रात्र - रात्रभर एकमेकांशी बोलायचो.  त्याच्यातील काही गोष्टी माझ्या ह्रदयाला स्पर्श करुन गेल्या', असं राखी सावंत म्हणाली. 'माझं राकेश बापटवर एकतर्फी प्रेम आहे. पण असुदे. जगात भरपूर लोक एकतर्फी प्रेम करतात, गरजेचं नाही ते पूर्ण झालंच पाहिजे. माझं स्वप्न पूर्ण नाही होणार आहे. पण स्वप्न बघायला हरकत काय? माझं स्वप्न  कधीही तुटू शकतं. किंवा पूर्णही होऊ शकतं. थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी..हम तो दिल दे ही चुके बस तेरी हाँ है बाकि, बापट..', असं राखी म्हणाली.

राखीकडून एकतर्फी प्रेमाची कबूली (Rakhi Sawant interview about Raqesh Bapat love confession)

'राकेशबरोबर मला गाणं करायचं आहे. तुम बिन माझं जीवन काहीच नाहीये राकेश.  तुम बिन Iam Finished.. मला माहितीये माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. पण एक मेसेज मी राकेशला देऊ इच्छिते..राकेश जरी नाही मिळाला तर मी मरणार नाही, मी जगणार आहे.  माझं मन आता कुणावरही नाही येणार.  मला  त्याचं प्रेम भेटणार आहे. नवरा म्हणून नाही तर, मित्र म्हणून नक्कीच मिळेल. राकेशचं कदाचित मन बदलू शकतं. तो आपल्या आई  आणि बहिणीला मनवू शकतो.  काहीही घडू शकतं. मी शांत आणि श्रीमंत आहे', असं राखी म्हणाली.

'त्याचं आता वय 47 आहे. आता त्याला कुठे 16 वर्षांची मुलगी भेटणार आहे का? मी त्याच्यापेक्षा लहान आहे. आता 2-3 वर्ष आहेत अजून, मुल  होऊ शकतं.  नंतर वय निघून गेलं की अडचणी येतात. मी त्याला सांगितलं होतं की,  विकी डोनरसारखं, माझ्या बाळाच्या जन्मासाठी तू डोनर हो.  तुझं स्पर्म डोनेट कर. तुला लग्न नाही करायचं ठीक आहे.    पण मला मुल हवंय, तू बाबा हो. तेव्हा बिग बॉसच्या घरात राकेश खूप हसला',  असं राखी सावंत म्हणाली. 'मी त्याला खूप सूट देईन.  माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. मी त्याच्यासाठी व्होट मागते', असंही राखी म्हणाली. टॉप 3 मध्ये कोणते स्पर्धक बाजी मारतील, यावर उत्तर देताना राखी म्हणते, 'राकेश, तन्वी आणि विशाल.. अनुश्री लवकर निघेल. अनुश्री शेवटपर्यंत राहणार नाही. लास्टमध्ये विशाल आणि तन्वी राहणार. मला बिग बॉस कळतं, असं राखी म्हणाली. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
South Singer Rimi Tomy Announced 2nd Marriage: 11 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोड, घटस्फोटाच्या 6 वर्षांनी प्रसिद्ध गायिका प्रेमात, 43 व्या वर्षी बांधणार दुसरी लग्नगाठ; होणाऱ्या नवऱ्याला पाहिलंत?
11 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोड, घटस्फोटाच्या 6 वर्षांनी प्रसिद्ध गायिका प्रेमात, 43 व्या वर्षी बांधणार दुसरी लग्नगाठ; होणाऱ्या नवऱ्याला पाहिलंत?
Madhuri Dixit On Gautami Patil: 'तुझ्यामुळे लावणीला गालबोट लागलं...', माधुरी दीक्षितचा हॉट सीटवरच थेट प्रश्न; गौतमी पाटील क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली...
'तुझ्यामुळे लावणीला गालबोट लागलं...', माधुरी दीक्षितचा हॉट सीटवरच थेट प्रश्न; गौतमी पाटील क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली...
Sameer Wankhede on Kranti Redkar: 'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा
'तिच्या नावातच Raidकर, तर मग मी...'; समीर वानखेडेंकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, ट्रेलर लाँचदरम्यान जुळ्या मुलींचीही चर्चा

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Embed widget