Rajkumar Rao :  बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) हल्ली बऱ्याच प्रमाणात चर्चांमध्ये आलाय. सध्या त्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तो फोटो पाहून त्याने प्लास्टिक सर्जरी केली असल्याचं बोललं जात आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राजकुमारची हनुवटी ही पहिल्यापेक्षा जास्त मोठी वाटली. तसेच त्याच्या चेहऱ्यामध्येही बराच फरक जाणवत आहे. 


या सगळ्या चर्चांवर आता राजकुमार रावची प्रतिक्रिया समोर आली आहे. पण राजकुमारने या सगळ्या चर्चांचं खंडन केलं आहे. त्याचप्रमाणे हा फोटो कोणीतरी एडिट केला असल्याचा देखील दावा यावेळी त्याच्याकडून करण्यात आलाय. त्याचप्रमाणे कुणीतरी प्रँन्क केला असल्याचंही त्याने म्हटलं आहे. पण ही प्रतिक्रिया देताना त्याने एका महत्त्वाच्या मुद्द्यावरही लक्ष वेधून घेतलंय. 


सुंदर दिसणं गरजेचं आहे - राजकुमार राव


राजकुमार रावने फिल्म कम्पेनियनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्याला विचारण्यात आलं की, अभिनेत्यांवरही अभिनेत्रींइतकाच सुंदर दिसण्याचा दबाव असतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्यानं म्हटलं की, हो, अभिनेत्यांवरही तितकाच दबाव असतो. मला नाही वाटत आमच्यासाठी काही वेगळं आहे. पण कदाचित तेवढं वाईट नसावं कारण ते लोक माझ्या चप्पलेवरुन कमेंट नाही करत. माझ्यासोबत हल्लीच असा प्रसंग घडला होता.त्यामुळे मला याविषयी माहिती आहे. फोटो काढताना एक चुकीचा अँगल, एक चुकीचा फोटो, एक चुकीची मोमेंट कॅप्चर होते आणि लोकं त्यावर उगाचच चर्चा करतात. मला नाही कळत असा का होतं. पण जितकी अभिनेत्रींना सुंदर दिसण्याची गरज असते तितकीच ती अभिनेत्यांनाही असते. 


दरम्यान राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केली नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं. तेव्हा त्याने म्हटलं की, काही वर्षांपूर्वी मला माझ्या लूकमुळे थोडं विचित्र वाटायचं, तेव्हा मी फिलर्स घेतले होते. मी ते चांगलं दिसण्यासाठी आणि चांगलं वाटण्यासाठी ते सगळं केलं होतं. त्याला आता जवळपास 8 ते 9 वर्ष झालीत आणि ते मला माझ्या डॉक्टरांनीच सजेस्ट केलं होतं.     






ही बातमी वाचा : 


Akshay Kumar : 25 महिने, 8 सिनेमे,7 फ्लॉप अन् एक हिट; असं आहे खिलाडी कुमारचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड