Akshay Kumar : अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बॉलीवूडमधील कामात सर्वात जास्त व्यस्त असणारा अभिनेता आहे. पण मागील काही काळापासून बॉक्स ऑफिसशी त्याचा काही मेळ जमत नसल्याचं चित्र आहे. त्यासाठी तो अनेक प्रयत्न करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. वेगळ्या आशयाच्या सिनेमांमधून मागील काही काळात अक्षय दिसला. तो नेहमीप्रमाणे वर्षाला 4 ते 5 सिनेमे देखील करत असल्याचं पाहायला मिळतंय. पण त्याचे चित्रपट काही केल्या हिट होत नसल्याचं चित्र आहे.


त्याचा नुकताच रिलीज झालेला बडे मियाँ छोटे मियाँ हा सिनेमादेखील फ्लॉपच झाला. 350 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या सिनेमाला 100 कोटींचा देखील आकडा पार करता आला नाही. या सिनेमाने केवळ 81 कोटींचे कलेक्शन केले. 


अक्षय कुमारचे फ्लॉप सिनेमे


अक्षय कुमारचे चित्रपट फ्लॉप होण्यास 18 मार्च 2022 पासून सुरुवात झाली.तेव्हा त्याचा बच्चन पांडे रिलीज झाला.  च्चन पांडे हा साऊथचा हिट चित्रपट जिगरतांडा चा रिमेक होता. पण दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारचे नशीब इथेही टिकले नाही.180 कोटींचा हा चित्रपट केवळ 75 कोटींची कमाई करू शकला. 


यानंतर 2022 मध्येच त्यांचा सम्राट पृथ्वीराज रिलीज झाला होता. हा एक बिग बजेट चित्रपट होता. त्यात मोठी स्टारकास्ट होती. पण हाही चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर त्याच्या रक्षाबंधन या सिनेमालाही काहीसा असाच प्रतिसाद मिळाला. 2022 मध्ये आलेला राम सेतू हा त्यांचा शेवटचा फ्लॉप चित्रपट होता.


OMG -2 झाला हिट


त्यानंतर 2023 मध्येही त्याच्या फ्लॉप सिनेमांचं सत्र असच सुरु राहिलं. त्यानंतर 2023 मध्ये आलेल्या ओएमजी 2 या सिनेमा हा काहीसा हिट ठरला आणि अक्षय कुमारला जरा दिलासा मिळाला. परंतु मिशन रानीगंज हा सिनेमा सर्वात मोठा डिजास्टर ठरला. त्यानंतर 2024ची देखील सुरुवात त्याच्यासाठी फारशी बरी झालेली नाहीये. 


पण गेल्या तीन वर्षात सातत्याने फ्लॉप चित्रपट दिले तरी त्याच्या खिलाडी कुमारच्या कामावर कसालाही परिणाम झालेला नाहीये. त्याच्या आगामी चित्रपटांवर नजर टाकली तर या यादीत 9 चित्रपट आहेत. यामध्ये सिरफिरा, सिंघम अगेन, स्काय फोर्स, वेलकम टू द जंगल, कन्नप्पा (तेलुगु), वेडात मराठे वी दौडले सात (मराठी)करा, खेल खेल में आणि हेरा फेरी 3 यांचा समावेश आहे. त्यामुळे यापैकी अक्षयचा कोणता सिनेमा हिट ठरणार याची उत्सुकता लागून राहिलीये. 




ही बातमी वाचा : 


Shriya Pilgaonkar : 'तू सुप्रिया आणि सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहेस का?' अखेर श्रियाने सोडलं मौन, म्हणाली,'माझं जन्मप्रमाणपत्र...'