Guru Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन होत असतं. त्यानुसार, गुरु ग्रह लवकरच आपली राशी बदलणार आहे. गुरु बृहस्पतिचे (Guru Gochar) संक्रमण वर्षातून एकदाच होते. याचाच अर्थ गुरूला सर्व 12 राशींमध्ये पोहोचण्यासाठी  तब्बल 12 वर्ष लागतात. सध्या गुरू ग्रह मेष राशीत स्थित आहे. 1 मे रोजी गुरूच्या राशीत बदल होणार असून तो वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरूचे हे संक्रमण दुपारी 1.50 वाजता होईल. हे संक्रमण वैशाख महिन्यातील सर्वात मोठे संक्रमण मानले जाणार आहे. 


24 एप्रिलपासून वैशाख महिना सुरू झाला आहे. गुरूच्या संक्रमणाच्या वेळी कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असणार आहे. गुरूच्या या राशी बदलामुळे या 4 राशींना फायदा होईल, चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी गुरूचे संक्रमण शुभ राहणार आहे. या काळात जे तरूण लग्नासाठी इच्छुक आहेत त्यांना लवकरच आपला जोडीदार भेटेल. लग्नाच्या वार्ता पुढे जातील. घरातील वातावरण प्रसन्न असेल. तुम्ही जे कार्य हाती घेतलं आहे ते वेळेत पूर्ण होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक संधी मिळतील. या कालावधीत, तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीत गुरुचे भ्रमण होणार आहे. यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण अद्भूत ठरू शकते. तुम्ही संशोधन, ज्योतिष यांसारख्या क्षेत्रात असाल तर हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर आहे. या काळात तुम्ही पैसे मिळवण्यासाठी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधांसाठी हे संक्रमण उत्तम राहील. घरातून तुमच्या विवाहासाठी परवानगी भेटेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


गुरूचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम देईल. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. तुमच्या विरोधकांशी सलोख्याने वागा. जर तुम्ही संशोधन कार्यात सहभागी असाल तर तुम्हाला या संक्रमणातून चांगले यश मिळेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात एकमेकांबद्दल समजूतदारपणा वाढेल. भविष्यात तुम्हाला परदेशी जाण्याचीही संधी मिळू शकते. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी गुरूचे संक्रमण महत्त्वाचे असणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा राहील. तुमचं नातं अधिक घट्ट होईल. हे संक्रमण विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्ही प्रेमविवाह करू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Dev : 'या' 3 राशींवर शनीची साडेसाती सुरु, तर 2 राशींवर ढैय्या; पुढच्या काळात कोणत्या राशींवर कधी असणार शनीची साडेसाती? जाणून घ्या