एक्स्प्लोर

Rajshri Deshpande: ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा कॅमेऱ्यासमोर; आत्मविश्वासानं मिरवल्या कर्करोगाच्या खुणा

Actress Rajshri Deshpande: अभिनेत्री राजश्रीने आपल्या खुणांना आपली ताकद बनवली आहे.

Rajshri Deshpande Breast Cancer Recovery: ग्लॅमर इंडस्ट्रीत बऱ्याचदा उणिवांना झाकले जाते. गेल्या काही दिवसांपासून आपल्या गंभीर आजारामुळे चर्चेत असणारी, अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajesh deshpande) सध्या आपल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.  काही महिन्यांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सरचं (Breast Cancer) निदान झालं होतं. तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तिची तब्येत बरी होत आहे.  आजारपणातून ती बाहेर येत आहे. सर्जरीनंतर तिच्या  ब्रेस्टवर शस्त्रक्रियेच्या खुणा होत्या.  तिनं त्या खुणा लपवण्याऐवजी अभिमानाने सर्वांसमोर फ्लॉन्ट केले आहेत.  तिनं शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.  दरम्यान, तिने घेतलेले हे धाडसी पाऊल केवळ तिच्या चाहत्यांनाच प्रेरणा देत नाही, तर, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लाखो महिलांनाही प्रेरणा देत आहे. 

राजश्रीवर शस्त्रक्रिया, बरी होताच शेअर केले खास फोटो (Rajshri Deshpande Turns Scars into Strength)

या वर्षीच्या मार्च महिन्यात राजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असल्याचा खुलासा केला होता.   तिनं सांगितलं की, 'रुटिन चेकअपदरम्यान,  ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सर इनफिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमाचे निदान झाले. केवळ कॅन्सर हा शब्द ऐकणंही काहींसाठी भीतीदायक ठरतं. हा प्रवास सोपा नव्हता.  या आजारपणाबाबत माहिती मिळताच मी ढसाढसा रडले.  मानसिकदृष्ट्या खूप खचले होते',  असं अभिनेत्री म्हणाली होती. 

'आई वडिलांना माहिती मिळाल्यानंतर मी सार्वजनिकरित्या सर्वांना सांगण्याचे धाडस केले.  वेळेवर निदान झाले असल्यामुळे शस्त्रक्रियाही यशस्वी पार पडली.   पण असंख्य टेस्ट आणि हॉस्पिटलमधील चकरा, यामुळे भावनांचा कल्लोळ सुरू होता', असंही अभिनेत्री म्हणाली होती.  अलिकडेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपल्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राजश्री सुरेख दिसत आहे. तिनं या फोटोतून आपल्या शस्त्रक्रियेच्या खुणा अगदी न घाबरता, धैर्याने दाखवले आहेत. 

'या खुणा माझ्या जगण्याची कहाणी सांगतात' (Rajshri Deshpande Instagram post after cancer surgery)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)

तिनं शेअर केलेल्या पोस्टवर कॅप्शनही दिलं आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की,  'या खुणा माझ्या जगण्याची कहाणी सांगतात.  प्रत्येक खुण ही खरंतर एक आठवण  सांगतात, मी लढले, जगले आणि जिंकले', असं अभिनेत्रीने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या खुणा डाग किंवा दोष नसून, धैर्याचे मुकूट आहे, असंही राजश्री म्हणाली. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'बिकीनी घालून तुझी बॉडी दाखव...', दिग्दर्शकाची घाणेरडी मागणी, मिथुन चक्रवर्तींच्या सुनेला आलेला हादरवणारा अनुभव

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Musafir Cafe in Real: विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?
विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
Embed widget