एक्स्प्लोर

Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’ची जगभरात गर्जना! बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ; 30 दिवसांनंतर कलेक्शन किती?

या यशामुळे मराठी चित्रपट मोठ्या बजेटमध्ये आणि जागतिक स्तरावरही प्रभाव निर्माण करू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुख दिग्दर्शित व अभिनित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या महिनाभरात मराठी सिनेसृष्टीचे अनेक रेकॉर्ड मोडत 115.97 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या झंजावाताने भल्याभल्यांना नमवलं. बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीचे अनेक रेकॉर्ड मोडले.  शिवाय ‘राजा शिवाजी’ हा जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. 

'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला असून जगभरात तब्बल ₹115.97 कोटींची कमाई केली आहे. भारतात ₹111.70 कोटींचे ग्रॉस कलेक्शन तर ओव्हरसीज मार्केटमध्ये ₹4.27 कोटींची कमाई करत या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा जागतिक स्तरावर रोवला आहे. तसेच चित्रपटाचे नेट कलेक्शन ₹94.56 कोटींवर पोहोचले आहे. तब्बल 89,752 शोमधून हा आकडा या चित्रपटाने गाठलाय. 

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 13.51 कोटी रुपये कमावत सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन केले होते. पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. दुसऱ्या आठवड्यापासून या चित्रपटाचा कलेक्शनचा ग्राफ काहीसा उतरला असला तरी दुसऱ्या आठवड्यातही 24.30 कोटी रुपये कमवत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला. तर तिसऱ्या आठवड्यात 12 कोटी रुपये या चित्रपटाने कमवले. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात 4.80 कोटी रुपयांचा आकडा गाठत पाचव्या आठवड्यात झोकात एन्ट्री घेतली. शुक्रवार आणि शनिवारी 0.32 कोटी तर 0.58 कोटी रुपये कमवत भारतभरात एकूण नेट कलेक्शन 94.56 कोटी रुपयांवर गेले आहे.

बॉक्स ऑफिसवर 30 दिवस दबदबा 

अनेक बॉलिवूड कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाची प्रदर्शना पूर्वीपासूनच प्रचंड चर्चा होती. 100 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बजेट तर वसूल केलंच पण शिवरायांच्या पराक्रमाची भव्य सिनेमॅटिक अनुभूती प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून गेली. महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे मराठी प्रेक्षकांसोबत हिंदी प्रेक्षकांनीही चित्रपटाला मोठा पाठिंबा दिल्याचे बॉक्स ऑफिस आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावरही ‘राजा शिवाजी’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या यशामुळे मराठी चित्रपट मोठ्या बजेटमध्ये आणि जागतिक स्तरावरही प्रभाव निर्माण करू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget