एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' सिनेमाचे 5 नवे विक्रम, 'सैराट'चाही रेकॉर्ड मोडला; रितेशच्या चित्रपटाने 25 दिवसांत किती गल्ला जमवला?

Riteish Deshmukh’s Raja Shivaji: 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक सिनेमा भारतात 100 कोटी कमावणारा पहिला मराठी चित्रपट ठरला.

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Records: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटानं सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) अक्षरश: धुमाकूळ घातला.  हा सिनेमा 1 मे रोजी सिनेमागृहांमध्ये (Entertainment) प्रदर्शित झाला. तेव्हापासून  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आहे.  बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड्स मोडण्यासोबतच या सिनेमानं अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.  मल्टिस्टारर 'राजा शिवाजी' या सिनेमानं आपला एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. या सिनेमानं महिनाभरात कोणते रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत?  चला तर मग, या रिपोर्ट्समधून 'राजा शिवाजी' या सिनेमाची पाच प्रमुख रेकॉर्ड्स जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद (Raja Shivaji breaks Sairat box office record)

'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक सिनेमा मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले.  रितेश देशमुख व्यतिरिक्त या सिनेमात इतर कलाकारांचीही महत्त्वाची भूमिका होती. या सिनेमात जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि विद्या बालन यांच्यासह इतर दमदार कलाकारांची महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचीही छोटी पण महत्त्वाची भूमिका आहे. 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून  बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे.  तसेच चौथ्या आठवड्यातही दमदार कमाई करत आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांच्या मते, सिनेमा रिलीजच्या 24 दिवसानंतरही बॉक्स ऑफिसवर कलेक्शन सुरू आहे. भारतात 24 दिवसांत या सिनेमानं 101.4 कोटींची कमाई केली आहे.  भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला असून,  'राजा शिवाजी' या सिनेमानं नवा इतिहास रचला आहे.  'राजा शिवाजी' या सिनेमानं 5 विक्रम आपल्या नावे केले आहेत.

'राजा शिवाजी' सिनेमानं  आपल्या नावे केले 5 नवे रेकॉर्ड्स (Riteish Deshmukh’s Raja Shivaji continues its historic box office run)

1. 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक सिनेमा भारतात 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

2.  'राजा शिवाजी' या सिनेमानं मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'सैराट' चित्रपटाचा 90 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडला. मराठीतील हाईस्ट ग्रॉसिंग सिनेमाचाही रेकॉर्ड 'राजा शिवाजी' या चित्रपटानं आपल्या नावावर केला आहे. 

3. 'राजा शिवाजी' या सिनेमानं जगभरात  114 कोटींहून अधिक कमाई करुन, आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे. 

4.  रितेश देशमुखच्या यशस्वी कारकिर्दीतील 'राजा शिवाजी' हा 10 वा सिनेमा आहे, ज्याने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.   त्याचे यापूर्वीचे नऊ सिनेमे हे मल्टीस्टारर कमर्शियल चित्रपट होते. 

5. 'राजा शिवाजी' या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 11.7 कोटी रुपयांची कमाई करत, मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आंबनेळी घाटातील थरारक अपघातात मराठी अभिनेत्यानंही जीव गमावला; 8 जणांसोबत स्कॉर्पिओत होता कलावंत

महत्त्वाच्या बातम्या

Riteish deshmukh On farah Khan: 'फराहबरोबर आधी काम कर आणि मगच तुझं मत बनव' प्राजक्ता कोळीला रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला...
'फराहबरोबर आधी काम कर आणि मगच तुझं मत बनव' प्राजक्ता कोळीला रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला...
Mrutyuchakra Trailer Released: 'या चक्रात जो अडकतो, तो परत येत नाही...', भीती आणि नियतीचा थरारक खेळ; मराठीतल्या सस्पेन्स, थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
'या चक्रात जो अडकतो, तो परत येत नाही...', भीती आणि नियतीचा थरारक खेळ; मराठीतल्या सस्पेन्स, थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
Bigg Boss Marathi Divya Shinde: डॉक्टरांना मारहाण करणं अंगलट आलं! 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेच्या अडचणीत वाढ; माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
डॉक्टरांना मारहाण करणं अंगलट आलं! 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेच्या अडचणीत वाढ; माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
World Coffee Day Bollywood: आलिया ते श्रद्धा कपूर, बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना कॉफीचं भारी वेड; कुणी ब्लॅक कॉफीचा चाहता, तर कुणी चक्क कॉफी शॉपमध्ये केलंय काम!
आलिया ते श्रद्धा कपूर, बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना कॉफीचं भारी वेड; कुणी ब्लॅक कॉफीचा चाहता, तर कुणी चक्क कॉफी शॉपमध्ये केलंय काम!

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Kunbi Caste Certificate : कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
सोमेश्वरच्या निवडणुकीत अजित 'दादाच' फॅक्टर; फोटो न वापरण्याचं पत्र, आता बंडखोर पुरुषोत्तम जगतापांची प्रतिक्रिया
सोमेश्वरच्या निवडणुकीत अजित 'दादाच' फॅक्टर; फोटो न वापरण्याचं पत्र, आता बंडखोर पुरुषोत्तम जगतापांची प्रतिक्रिया
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Embed widget