एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'राजा शिवाजी'मध्ये अफजलचा कोथळा काढताना 'ती' चूक, ऐतिहासिक संदर्भ; भाजप कार्यकर्त्याला रितेश देशमुखचं उत्तर

Raja Shivaji controversy: . महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि अभिमान याच्यात छेडछाड केली का? असा सवालही त्यांनी विचारलाय. यानंतर रितेशने त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

Raja Shivaji: सध्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाची मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. रितेश देशमुखच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक होत असताना सोशल मीडियावर  ऐतिहासिक संदर्भात चूक झाल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्याने थेट अभिनेता रितेश देशमुखला ट्वीट करत सवाल केला. (Riteish Deshmukh)

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढताना एका दृश्यात  ही कथित चूक  झाल्याचं त्यांनी सांगताच रितेश देशमुखने भाजप कार्यकर्त्याला प्रत्युत्तर दिलंय. याची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हल्ल्यापूर्वी अफजलखानाला उघडपणे वाघनखं दाखवताना दिसत असल्याचं या भाजप कार्यकर्त्यांनं म्हटलंय. महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि अभिमान याच्यात छेडछाड केली का? असा सवालही त्यांनी विचारलाय. यानंतर रितेशने त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

नेमकं प्रकरण काय ? 

सध्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाची सर्व स्तरांमध्ये चर्चा सुरू आहे.  या सिनेमाचा ट्रेलर पाहून अनेक जण रितेश सह सर्व कलाकारांचे कौतुक करताना दिसत आहेत. त्यातच भाजप कार्यकर्त्याने केलेल्या एका ट्विटची चर्चा आहे. सुरेश नखुआ यांनी केलेल्या ट्विटमध्ये ' राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणाऱ्या शिवरायांच्या हातातील वाघनख्यांवरून रितेश देशमुखला काही सवाल केले आहेत. 

त्यांनी म्हटलं ' रितेश देशमुखच्या या चित्रपटाचा ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हल्ल्यापूर्वी अफजलखानाला उघडपणे वाघनख दाखवताना दिसत आहेत. अफजलखानाच्या हल्ल्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांचा वापर केला होता ही ऐतिहासिक वस्तू स्थिती आहे..  रितेश देशमुख का छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा इतिहास वारसा आणि अभिमान यांची छेडछाड आणि अपमान करतायेत ? ? असा सवाल त्यांनी केला.  छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघ नखा दाखवली होती का ? अफजलने महाराजांवर हल्ला केल्यानंतर वागणं बाहेर आली. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची अशी छेडछाड का ? असा सवाल उपस्थित केल्यानंतर रितेश देशमुखनेही त्यांच्या या सवालांवर प्रत्युत्तर केलंय.

रितेश म्हणाला " आदरणीय सर, कृपया एक मे रोजी हा चित्रपट नक्की बघा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर चित्रपटात आहे. मला आशा आहे की आपण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह चित्रपटाचा आनंद घ्याल .जय शिवराय " असं तो म्हणाला. यानंतर सोशल मीडियावर अनेक जण रितेशच कौतुक करताना दिसतायेत.

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget