एक्स्प्लोर

Raja Shivaji: 100 कोटींच्या ‘राजा शिवाजी’वर सेन्सॉर बोर्डची कात्री; मेकर्सना दिले महत्वाचे निर्देश; नेमकं कारण काय?

Raja Shivaji: संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन अशा दिग्गज कलाकारांची ‘राजा शिवाजी’ सिनेमात मांदियाळी आहे.

Raja Shivaji Censor cut: रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा सध्या ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट एक मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.  रितेशने हा चित्रपट आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं आहे. जेनेलियाने या चित्रपटात अभिनयासोबत निर्मितीची जबाबदारीही सांभाळली आहे. दरम्यान, आता या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री चालल्याची माहिती समोर आली आहे. (Censor Board Cuts)

दरम्यान, राज्यभरात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांवर गेल्या काही दिवसांत होणाऱ्या वक्तव्यांची चर्चा होतेय. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नुकतंच अभिनेता रितेश देशमुखने ही प्रतिक्रिया दिली.  महापुरुषांच्या ऐतिहासिक संदर्भाविषयी राज्यभरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे. आता ' राजा शिवाजी ' चित्रपटात सेंसॉर बोर्डाने निर्मात्यांना अधिक स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ देण्याचा निर्देश दिले आहेत.

मेकर्सना दिले सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’मधील काही सीनमध्ये बदल करण्यात आले आहेत. CBFCने निर्मात्यांना डिस्क्लेमर अधिक स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, चित्रपटात व्हॉईसओव्हर जोडण्यासही सांगितलं आहे. चित्रपटाच्या शीर्षकाबाबतही स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच, चित्रपटातील कथा, संवाद आणि गाण्यांसाठी वापरलेल्या ऐतिहासिक संदर्भांची माहिती देण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.

किती आहे ‘राजा शिवाजी’चा रनटाइम?

रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने नुकतीच सेन्सॉर प्रक्रिया पूर्ण केली आहे. चित्रपटाला Central Board of Film Certification (CBFC) कडून U/A प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. मराठी व्हर्जनचा रनटाइम 195 मिनिटांचा म्हणजेच 3 तास 15 मिनिटे 5 सेकंद इतका आहे. त्यामुळे हा चित्रपट लांब कालावधीच्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. यापूर्वी ॲनिमल (203 मिनिटे), धुरंधर (214 मिनिटे) आणि पुष्पा 2 :द रूल (200 मिनिटे) या चित्रपटांचा यात समावेश आहे.

दिग्गज कलाकारांची ‘राजा शिवाजी’ सिनेमात मांदियाळी

संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन अशा दिग्गज कलाकारांची ‘राजा शिवाजी’ सिनेमात मांदियाळी आहे. रितेश देशमुख यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. याचा पहिला लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. टीझरमध्ये रितेशला महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यावर प्रेक्षक एकच जल्लोष करताना दिसत आहेत. तर, त्याची पत्नी जिनिलीया देशमुख या सिनेमात सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून पोस्टरमधील त्यांचा लूक चर्चेत आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhargavi Chirmule Comeback On Star Pravah: कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?
कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?
Salman Khan Karan Johar: 'मी व्हर्जिन आहे', असं म्हणत सलमान खानने 'कॉफी विथ करण' गाजवलं; आता पुन्हा भाईजानची एन्ट्री, कोणतं सिक्रेट उघड करणार?
'मी व्हर्जिन आहे', असं म्हणत सलमान खानने 'कॉफी विथ करण' गाजवलं; आता पुन्हा भाईजानची एन्ट्री, कोणतं सिक्रेट उघड करणार?
Rahul Vaidya On Intimacy Remark: बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
Nana Patekar in Khashaba: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमात नाना पाटेकर? कोणती भूमिका साकारली?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमात नाना पाटेकर? कोणती भूमिका साकारली?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Embed widget