एक्स्प्लोर

Raja Shivaji Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठड्यातही 'राजा शिवाजी'चा डंका, 100 कोटींच्या कमाईपासून किती पावलं दूर ?

Raja Shivaji: तिसऱ्या आठवड्यात कमाईचा आकडा कमी दिसत असला तरी राजा शिवाजी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी तयार झाला आहे.

Raja Shivaji Box Office Collection worldwide: छत्रपती शिवरायांच्या यशावर आधारित 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुरळा उडवलाय. 'ओपनिंग डे' लाच 13.51 कोटींचं कलेक्शन करत प्रेक्षकांची पसंती मिळवली. आठवड्याभरात कलेक्शनमध्ये काहीशी घट दिसत असली तरी प्रदर्शनाच्या तिसऱ्या शनिवारी पुन्हा एकदा मुसंडी मारत चित्रपटाने 3.19 कोटी रुपयांची कमाई केली. (Raja Shivaji) प्रदर्शनाच्या 16व्या दिवशीची ही कमाई आहे. दोन आठवड्यात या चित्रपटाने देशभरात 88.85 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन नोंदवण्यात आलं आहे. 100 कोटींपर्यंत हा चित्रपट पोहोचेल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 

 जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित राजा शिवाजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. दुसऱ्या आठवड्याचा शेवट 84.70 कोटींच्या निव्वळ कमाईने केल्यानंतर शनिवारी वीकेंड चा फायदा या चित्रपटाला झाल्याचा दिसतंय .  2.70 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन व 24.9 % प्रेक्षक संख्यसह देशभरातील 2172 शोमध्ये काल हा चित्रपट पाहिला गेला.

राजा शिवाजीची आतापर्यंतची वाटचाल

मराठी सिनेसृष्टीतील आत्तापर्यंतचा सर्वात विक्रमी कमाईचा पहिला आठवडा गाजवल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक गाथेने देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. दुसरा आठवड्यातही आपली घोडदौड कायम ठेवत 24.30 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवास काहीसा खडतर वाटत असला तरी वीकेंडचा फायदा या चित्रपटाला होताना दिसतोय. तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच 15 व्या दिवशी राजा शिवाजी चित्रपटाने 1.71 कोटी ग्रॉस व 1.45 कोटी नेट कमाई केली. तर शनिवारी 2.70 कोटींची नेट कमाई या चित्रपटाने केली.

पहिला आठवडा: ₹7.70 कोटी
दुसरा वीकेंड: ₹17.40 कोटी
11वा दिवस (सोमवार): ₹2.65 कोटी
12वा दिवस (मंगळवार): ₹2.75 कोटी
13वा दिवस (बुधवार): ₹2.10 कोटी
14वा दिवस (गुरुवार): ₹2.10 कोटी
15वा दिवस (शुक्रवार):₹ 1.45  कोटी 
16 वा दिवस (शनिवार):₹ 2.70 कोटी 

एकूण कमाई: 88.85 कोटी 

तिसऱ्या आठवड्यात कमाईचा आकडा कमी दिसत असला तरी राजा शिवाजी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी तयार झाला आहे. 100 कोटींचा क्लब गाठण्यासाठी या चित्रपटाची वाट काहीशी खडतर आहे. चित्रपटाला 100 कोटींसाठी  14 कोटी रुपयांची नोंद होणं आवश्यक आहे.

दिग्गज कलाकारांची फौज

सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे दमदार संगीत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांचे अप्रतिम छायांकन या चित्रपटाला वेगळीच उंची प्रदान करत आहे. प्रत्येक फ्रेममध्ये भव्यता आणि ऐतिहासिक वास्तवतेची झलक जाणवते. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे, ज्यामुळे या चित्रपटाचा आवाका अधिकच भव्य झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget