एक्स्प्लोर

Raja Shivaji Box Office Collection Day 4: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'च्या कमाईत चौथ्या दिवशी कमालीची घट; आतापर्यंत किती कोटींची कमाई?

Raja Shivaji Box Office Collection Day 4: रणवीर सिंह अभिनीत 'धुरंधर 2'नंतर, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला दुसरा सिनेमा मानला जातोय.

Raja Shivaji Box Office Collection Day 4: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाची (Raja Shivaji Movie) सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 'राजा शिवाजी' सिनेमा रिलीज करण्यात आला आणि अवघ्या महाराष्ट्रानं सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याची गाथा सांगणाऱ्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Raja Shivaji Box Office Collection) दमदार सुरुवात केली. तसेच, मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट ठरलाय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच सिनेमानं प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. सिनेमाच्या कमाईचे आकडे ऐकून हे लक्षात येतंच. पण, तीन दिवस धमाकेदार कमाई करणाऱ्या या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये चौथ्या दिवशी मात्र काहीशी घट पाहायला मिळाली.  

रिलीजच्या चौथ्या दिवशी 'राजा शिवाजी' सिनेमाचं कलेक्शन किती? (Raja Shivaji Box Office Collection Day 4)

रणवीर सिंह अभिनीत 'धुरंधर 2'नंतर, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला दुसरा सिनेमा मानला जातोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्याच्या शेवटी (Opning Weekend) जबरदस्त कमाई केल्यानंतर, या मराठी सिनेमानं त्याची सोमवारची कठीण परीक्षा (Monday test) यशस्वीरित्या पास केली आहे. 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी, म्हणजे, पहिल्या विकेंडनंतरचा पहिला सोमवारी 'राजा शिवाजी'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अंदाजे 5.60 कोटी रुपयांची कमाई केली. आधीच्या तीन दिवसांच्या तुलनेत ही कमाई खूपच कमी असली तरीसुद्धा सिनेमानं सोमवारची टेस्ट पास केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आतापर्यंतची 'राजा शिवाजी' सिनेमाची कमाई किती? (Raja Shivaji Box Office Net Collection)

'सॅकनिल्क'नं दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 मे 2026 रोजी रिलीज झालेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाला आता चार दिवस झालेत. या सिनेमानं चार दिवसांत धुवांधार कमाई केली आहे. पण, सोमवारी या सिनेमाच्या कमाईत काहीशी घट पाहायला मिळाली. 'राजा शिवाजी' सिनेमानं सोमवारी 5.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 

'राजा शिवाजी' सिनेमानं शुक्रवारी रिलीज होताच, दमदार कमाई करत इतिहास रचला. सिनेमानं शुक्रवारी म्हणजेच, रिलीजच्या पहिल्याच दिवशी 12.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमानं 11.50 कोटी कमावले.  रविवारी मात्र सिनेमानं बक्कळ कमाई केली. 'राजा शिवाजी' सिनेमानं रविवारी तब्बल 13.10 कोटी रुपयांची कमाई केली, रविवारच्या तुलनेत सोमवारी या सिनेमाची कमाई निम्म्याहून कमी झाली. चार दिवसांत या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 42.60 कोटी रुपयांचं कलेक्शन केलंय. 

'राजा शिवाजी' सिनेमाच्या कमाईचे आकडे

  • पहिला दिवस, 1 मे 2026 : 12.40 कोटी
  • दुसरा दिवस, 2 मे 2026 : 11.50 कोटी
  • तिसरा दिवस, 3 मे 2026 : 13.10 कोटी
  • चौथा दिवस, 4 मे 2026 : 5.60 कोटी

    एकूण कमाई : 42.60 कोटी

दरम्यान, प्रख्यात अभिनेता रितेश देशमुख याची प्रमुख भूमिका असलेला, 'राजा शिवाजी' हा अलिकडील मराठी चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासोबतच, रितेश देशमुखनं यात मुख्य भूमिकाही साकारली असून, तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपात पडद्यावर अवतरला आहे. तर, त्याच्यासोबतच सिनेमात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट झळकली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; अवघ्या 3 दिवसांत काळजाला भिडला, कमाई किती?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget