एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' च्या सिंहगर्जनेनं बॉक्स ऑफिस दुमदुमलं, 26 व्या दिवशीही शोज फूल्ल, किती कोटी कमावले?

Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी' चित्रपटानं 26 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमाई केली.

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie: मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत रिलीज झालेल्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) डंका गाजवला तसेच प्रेक्षकांच्या मनातही विशेष स्थान मिळवलं. 1 मे रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता.  26 व्या दिवशीही या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर (Entertainment) घौडदौड कायम आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' या सिनेमात तगड्या स्टारकास्टची फौज पाहायला मिळत आहे.  जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचीही महत्त्वाची भूमिका आहे. रिलीज झाल्यापासून या सिनेमाचं विशेष कौतुक होत आहे. दरम्यान, 26 व्या दिवशी या सिनेमाने किती कोटींची कमाई केली? पाहूयात. 

26 व्या दिवशी 'राजा शिवाजी' सिनेमाने किती कोटींचे कलेक्शन केले? (Raja Shivaji Marathi and Hindi collection report)

'राजा शिवाजी' हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीपासून चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. 26 दिवसांत या सिनेमाने बरेच रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान, 26 व्या दिवशी सिनेमाने किती रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले?  जाणून घेऊयात.    सॅकनिल्क ट्रेंडच्या रिपोर्ट्सनुसार, 26  जून रोजी म्हणजेच मंगळवारी या सिनेमाने अडुसष्ट लाख रुपयांची कमाई केली आहे.  हिंदी भाषेत 14 लाख आणि मराठी भाषेत या सिनेमाने 54 लाख रुपयांची कमाई केली आहे. 

26 व्या दिवशी एकूण 834 शोज पार पडले. एकूण 834 शोजमधून अडुसष्ट लाख रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले आहे. तिसऱ्या आठवड्यातही या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारीत 'राजा शिवाजी' या सिनेमात रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजूही रितेश देशमुखने सांभाळली. दमदार स्टारकास्टमुळे या सिनेमाला विशेष पसंती मिळाली. तगड्या स्टारकास्टमुळे या सिनेमाचा आवाका अधिकच भव्य झाला. या सिनेमाला संगीत अजय - अतुल यांनी दिलं.  हा सिनेमा आणखी किती रेकॉर्ड्स मोडणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आंबनेळी घाटातील थरारक अपघातात मराठी अभिनेत्यानंही जीव गमावला; 8 जणांसोबत स्कॉर्पिओत होता कलावंत

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget