एक्स्प्लोर

Raja Shivaji: राजा शिवाजी चित्रपटातील अंगावर काटा आणणारं छत्रपती अँथम, नाशिक ढोलच्या साथीने अजय-अतुलने रोमांच उभा केला!

या BTS व्हिडिओमधून चित्रपटाच्या निर्मितीची भव्यता, संगीताची ताकद आणि संपूर्ण टीमची मेहनत यांची एक झलक पाहायला मिळते, ज्यामुळे या ऐतिहासिक महाकाव्याबद्दलची अपेक्षा अधिकच वाढली आहे.

Raja Shivaji: 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी'कडून सादर होत असलेल्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता आणखी शिगेला पोहोचली आहे. अलीकडेच चित्रपटाचे प्रभावी पोस्टर प्रदर्शित करून चर्चेचा विषय ठरलेल्या निर्मात्यांनी, आता चित्रपटातील ‘राजा शिवाजी अँथम’ अर्थात “छत्रपती” या गीताचा चित्रीकरणामागील (BTS) एक भव्य आणि ऊर्जा देणारा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या BTS व्हिडिओमधून चित्रपटाच्या निर्मितीची भव्यता, संगीताची ताकद आणि संपूर्ण टीमची मेहनत यांची एक झलक पाहायला मिळते, ज्यामुळे या ऐतिहासिक महाकाव्याबद्दलची अपेक्षा अधिकच वाढली आहे.

अंगावर काटा आणणारं छत्रपती अँथम

या चित्रपटातील हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले असून, त्यांनीच ते आपल्या दमदार आवाजात सादर केले आहे. या गीताच्या BTS व्हिडिओमध्ये मोठ्या पडद्यावरील अनुभव अधिक प्रभावी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य, शक्तिशाली आणि उत्तुंग अशा संगीत रचनेची स्पष्ट झलक दिसून येते. प्रत्येक बीट, प्रत्येक स्वर आणि प्रत्येक दृश्यामागे बारकाईने केलेली मेहनत या व्हिडिओतून जाणवते. याआधी या गीताचा मुखडा (Chorus) प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांनी त्याला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला होता; आता संपूर्ण गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘राजा शिवाजी अँथम’ “छत्रपती” हे १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून, या गीतातून हिंदवी स्वराज्याचा आत्मा, शौर्य आणि प्रेरणा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संगीत, दृश्यरचना आणि भावनिक उंची यांचा संगम असलेले हे गीत चित्रपटाचा आत्मा ठरणार असल्याची सर्वत्र  चर्चा आहे.

 

दमदार स्टारकास्ट

या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश विलासराव देशमुख यांनी केले असून, त्यांनीच लेखक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत तिहेरी जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांच्या या बहुआयामी भूमिकेमुळे चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळणार असल्याचे स्पष्ट दिसते. चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया  देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला एक भक्कम कलाकार संच पाहायला मिळणार आहे.

कधी होणार चित्रपट प्रदर्शित?

'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि आधारित राजा  शिवाजी १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.एकूणच, “राजा शिवाजी” हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून, तो भारतीय इतिहासाचा गौरवशाली अध्याय मोठ्या पडद्यावर सजीव करणारा एक भव्य अनुभव ठरणार आहे. ‘राजा शिवाजी अँथम’ “छत्रपती” या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना या ऐतिहासिक प्रवासाची एक प्रभावी झलक मिळाली असून, आता संपूर्ण चित्रपटाची प्रतीक्षा अधिकच उत्कंठावर्धक झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget