एक्स्प्लोर

Raid 2 Box Office Collection Day 21: कमाईत घट, पण तरीसुद्धा रिलीजच्या 21व्या दिवशी सर्वांना पुरून उरला 'रेड 2', कलेक्शन किती?

Raid 2 Box Office Collection: अजय देवगणचा नुकताच प्रदर्शित झालेला 'रेड 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपटाच्या कमाई आता बरीच घट झाली असली तरी, तो अजूनही कोट्यवधींमध्ये कमाई करतोय.

Raid 2  Box Office Collection Day 21: अजय देवगण (Ajay Devgn), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) स्टारर 'रेड 2' (Raid 2) हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालतोय. हा क्राईम थ्रिलर चित्रपट (Crime Thriller Movie) रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. याच कारणास्तव, हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांना चित्रपटगृहात आकर्षित करण्यात यशस्वी ठरतोय आणि भरपूर पैसेही कमवतोय. 'रेड 2'नं रिलीजच्या 21 व्या दिवशी म्हणजेच, तिसऱ्या बुधवारी किती कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात.

'रेड 2'नं 21 व्या दिवशी किती कमाई केली?

अजय देवगणच्या सिनेमानं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करण्याचा मान मिळवला आहे. नुकताच रिलीज झालेला सिक्वेल चित्रपट 'रेड 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट दमदार आशय आणि स्टारकास्टच्या जबरदस्त अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकतोय. 21 दिवस जुना हा चित्रपट टॉम क्रूझच्या अलिकडेच रिलीज झालेल्या 'मिशन इम्पॉसिबल 8' च्या विरोधातही उभा आहे आणि कोट्यवधींची कमाई करतोय. 'छावा'नंतर 2025 सालचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरलेला 'रेड 2' या चित्रपटानं 48 कोटी रुपयांच्या बजेटपेक्षा तिप्पट कमाई केली आहे, पण त्याची कमाई कमी होत नाही. अशातच आता  'रेड 2' आणखी एक नवा विक्रम तिच्या नावावर करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या सगळ्यामध्ये, जर आपण चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, 

  • 'रेड 2' चा पहिल्या आठवड्याचा कलेक्शन 95.75 कोटी रुपये होता.
  • दुसऱ्या आठवड्यात त्यानं 40.6 कोटी रुपये कमावले.
  • चित्रपटानं 16 व्या दिवशी 3 कोटी रुपये आणि 17 व्या दिवशी 4.25 कोटी रुपये कमावले.
  • 18 व्या दिवशी 'रेड 2' ने 5.65 कोटी रुपये कमावले आणि 19 व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 1.85 कोटी रुपये होते.
  • 'रेड 2'नं 20 व्या दिवशी 1.97 कोटी रुपये कमावले.
  • सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'रेड 2'नं रिलीजच्या 21 व्या दिवशी 1.75 कोटी रुपये कमावले आहेत.
  • यासह, 'रेड 2' ची 21 दिवसांत एकूण कमाई आता 155.10 कोटी रुपये झाली आहे.

'रेड 2' आणखी एक विक्रम रचणार 

'रेड 2' च्या कमाईचा वेग आता मंदावला आहे आणि तो आता 2 कोटींपेक्षा कमी कमाई करत आहे, परंतु 21 व्या दिवशी त्यानं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. खरं तर, 'रेड 2'नं 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या 'टोटल धमाल' या चित्रपटाच्या भारतात 155.67 कोटी रुपयांच्या कलेक्शनला जवळजवळ मागे टाकलं आहे. यासह, हा अभिनेत्याच्या कारकिर्दीतील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. आता ते 200 कोटी रुपयांच्या आकड्याकडे वाटचाल करत आहे. 'रेड 2' कमी होत असलेल्या कमाईसह हा टप्पा ओलांडू शकेल की, नाही हे पाहणं बाकी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rashami Desai Casting Couch: 'ऑडिशनच्या निमित्तानं घरी बोलावलं आणि बेशुद्ध केलं...'; कास्टिंग काऊचच्या अतीप्रसंगाबाबत अभिनेत्री स्पष्टच बोलली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Embed widget