एक्स्प्लोर

Raid 2 BO Collection Day 2: रिलीजच्या दुसऱ्या दिवशी अजय देवगणच्या 'रेड 2'चा धमाका, 2025 च्या 10 फिल्मसचे रेकॉर्ड केलेत चक्काचूर

Raid 2 Box Office Collection Day 2: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलंय. या चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी उत्तम कलेक्शन केलंय आणि अनेक चित्रपटांनाही मागे टाकलंय.

Raid 2 Box Office Collection Day 2: अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रेड 2' (Raid 2) हा चित्रपट महाराष्ट्र दिनानिमित्त म्हणजेच, 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच बरीच हवा निर्माण केली होती, ज्यामुळे देशभरात त्याचं अॅडव्हान्स बुकिंग खूप झालं आणि अपेक्षेप्रमाणे 'रेड 2' (Raid 2 Movie) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) ब्लॉकबस्टर सुरुवात केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाची टक्कर संजय दत्तच्या 'भूतनी'सोबतच, दोन साऊथ इंडियन चित्रपट 'हिट 3' आणि 'रेट्रो' व्यतिरिक्त हॉलिवूड फिल्म 'थंडरबोल्ट्स' (Thunderbolts*) यांच्याशी आहे. पण नव्या बॉक्स ऑफिसवर रिलीज करण्यात आलेल्या चित्रपटांमध्येही 'रेड 2' ची धमाकेदार ओपनिंग झाली. दुसऱ्या दिवशी 'रेड 2'नं बॉक्स ऑफिसवर किती कमावले? सविस्तर पाहूयात... 

'रेड 2'नं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी किती कमाई केली?

राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड'चा सिक्वेल आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगणनं पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आणि आपल्या दमदार अभिनयानं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय. हा चित्रपट 2025 सालचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, ज्यानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 19.25 कोटी रुपयांची कमाई केली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

  • सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'रेड 2' ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 11.75 कोटी रुपये कमावले आहेत.
  • यासह, 'रेड 2' ची दोन दिवसांत एकूण कमाई 31 कोटी रुपये झाली आहे.
  • 'रेड 2' नं दुसऱ्या दिवशी 2025 च्या या चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे. 
  • 'रेड 2' नं दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे, जरी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली असली तरी, त्याने
  • 2025 च्या अनेक चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला टाकले आहे.  

बॉलिवूड हंगामाच्या आकडेवारीनुसार, 'रेड 2' ने 'या' चित्रपटांना मागे टाकलंय

चित्रपटाचं नाव कमाई
ग्राउंड जीरो 5 कोटी
सुपरबॉयज ऑफ मालेगांव  3.54 कोटी
क्रेजी  11.09 कोटी
मेरे हसबंड की बीवी 9.38 कोटी
लवयापा  7.04 कोटी
बॅडएस रवि कुमार  9.66 कोटी 
इमरजेंसी 16.52 कोटी
आजाद 6.32 कोटी
फतेह 12.85 कोटी
गेम चेंजर 26.60 कोटी

'रेड 2' त्याचे बजेट वसूल करण्यापासून फक्त इंचभर दूर 

'रेड 2' हा चित्रपट फक्त 48 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांत 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवल्यानं, या चित्रपटानं त्याच्या बजेटच्या 80 टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल केली आहे. अशातच आता अजयच्या सिनेमाला त्याचं भांडवल वसूल करण्यासाठी आणखी 18 कोटी रुपयांची कमाई करण्याची गरज आहे. या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट आपलं भांडवलं वसूल करेल आणि त्यानंतर बक्कळ नफा कमावेल, त्यामुळे 'रेड 2' हिट होईल, अशी अपेक्षा आहे.

'रेड 2' ची स्टार कास्ट

राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' हा एक हिंदी क्राईम थ्रिलर चित्रपट आहे, जो 'रेड' (2018) या चित्रपटाच्या सात वर्षांनंतर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा आयआरएस अधिकारी अमय पटनायक (अजय देवगण) यांच्याभोवती फिरते. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget