एक्स्प्लोर

Radhika Apte: आधी ॲक्शन सीनमध्ये बटन न लावण्याची विचित्र मागणी, नंतर इनरवेअरमध्येच..; राधिका आपटे इंटिमेट सीनवर बेधडक बोलली, म्हणाली...

करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने काही चित्रपटांमध्ये न्यूड आणि इंटिमेट सीन्स केले होते. मात्र, त्यानंतर इंडस्ट्रीतील काही लोकांनी तिच्याबद्दल एक वेगळीच धारणा करून घेतल्याचं राधिकाने सांगितलं.

Radhika Apte: राधिका आपटे (Radhika Apte) कायमच आपल्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर बेधडक बोलताना दिसलीय. सध्या ‘लस्ट स्टोरीज 3’मुळे (Lust Stories 3) राधिका पुन्हा चर्चेत आलीय. काम, वैयक्तिक निर्णय आणि चित्रपटाच्या सेटवर आलेल्या काही विचित्र अनुभवांबद्दल राधिकाने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत बेधडक भाष्य केलं आहे. राधिका आपटेने चित्रपटांमध्ये गरज नसताना दाखवल्या जाणाऱ्या न्यूडिटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने सेटवर घडणाऱ्या काही विचित्र गोष्टींचा उल्लेख करताना स्वतःचा अनुभवही सांगितला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने काही चित्रपटांमध्ये न्यूड आणि इंटिमेट सीन्स केले होते. मात्र, त्यानंतर इंडस्ट्रीतील काही लोकांनी तिच्याबद्दल एक वेगळीच धारणा करून घेतल्याचं राधिकाने सांगितलं.

‘ही तर करेलच’, असं लोकांना वाटायचं..

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने सांगितलं की,“सुरुवातीला मी चार-पाच चित्रपट केले होते, ज्यामध्ये मी पूर्णपणे न्यूड होते. त्यामुळे अनेकांना वाटायचं की, ‘ही तर करेलच.’ मग मला त्यांना सांगावं लागायचं की, ‘ऐका, मी खरं तर असं करणार नाही. तुम्हाला असं का हवं आहे? मी आता तिला किस का करावं?’ त्यावर अनेक जण ‘थोडं करून घे ना’ असं म्हणायचे.” अनेकदा ‘फक्त थोडं किसिंग’ किंवा काही सेकंदांचं इम्प्रोव्हायझेशन करण्याच्या सूचना दिल्या जायच्या.

ॲक्शन सीनदरम्यान शर्टची बटनं न लावण्याची विचित्र मागणी

राधिकानं आणखी एका प्रसंगाचा उल्लेख केला. एका ॲक्शन सीनबाबत चर्चा सुरू असताना अचानक तिच्या आउटफिटचा विषय काढण्यात आला. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला शर्टची बटनं न लावता ॲक्शन सीन करता येईल का, असं विचारण्यात आलेलं.ती म्हणाली, ‘एका सेटवर त्यांनी मला विचारलं, राधिका, तुम्ही हा ॲक्शन सीन करू शकता का? तुम्ही बटनं न लावता हा सीन केलात तर? मी म्हणाले, हा ॲक्शन सीन आहे. त्यामुळे शर्ट हलणारच ना? बेसिक फिजिक्स. त्यावर त्यांनी विचारलं, तुम्ही फक्त इनरवेअरमध्ये हा सीन केला तर? मी म्हणाले, तुम्हाला माझ्याकडून नेमकं काय करून घ्यायचं आहे?’

‘Parched’मधील न्यूड सीनवरही राधिकानं केलेलं भाष्य

राधिकानं याआधी 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Parched’ चित्रपटातील न्यूड सीनबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली होती. हा सीन ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर मी निराश झाले नव्हते.असं  राधिकाने PTIशी बोलताना सांगितलेलं. राधिकानं म्हटलं होतं की, ‘यामुळे मला कोणतीही निराशा झाली नाही. न्यूड सीन समोर आल्यामुळे मी अस्वस्थ नाही झाले. मला या सगळ्या गोष्टींची चिंता नाही. माझ्या भूमिकेसाठी मला न्यूड सीन करावा लागणार आहे, हे मला माहीत होतं. मात्र माध्यमांमध्ये याबाबत ज्या पद्धतीने चर्चा झाली, ते पाहून मला आश्चर्य वाटलं. हा चित्रपट या एका सीनपेक्षा खूप मोठा आहे.’

राधिका आपटेंचं वैवाहिक आयुष्य

राधिका आपटेनं 2012 मध्ये ब्रिटिश संगीतकार आणि कंपोजर बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं. दोघांनीही आपलं वैवाहिक आयुष्य बरंच खासगी ठेवलं आहे. 2024 मध्ये दोघे पहिल्यांदा पालक झाले आणि त्यांना एक मुलगी आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लंडन फिल्म फेस्टिव्हलदरम्यान राधिकानं आपल्या प्रेग्नन्सीची बातमी सार्वजनिक केली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर राधिका आपटे सध्या ‘लस्ट स्टोरीज 3’ मुळे चर्चेत आहे. राधिका आपल्या बेधडक अंदाजासाठी आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी यापूर्वीही प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिली आहे. ‘लस्ट स्टोरीज 3’ 18 सप्टेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Advertisement

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Embed widget