Radhika Apte Movie : अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने केवळ मराठी सिनेसृष्टीतच नाही तर बॉलीवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे राधिका ही तिच्या अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असते. नुकतच राधिकाच्या चाहत्यांना एक गुडन्यूज मिळाली आहे. राधिका आपटेच्या सिस्टर मिडनाईट या सिनेमाला कान्स सोहळ्यात स्थान मिळालं आहे.                                                                                       


करण कंधारीचं पदार्पण असलेला सिस्टर मिडनाईट या सिनेमाचा फेस्टिव्हलच्या डायरेक्टर्स फोर्टनाइटमध्ये प्रीमियर होणार आहे. या चित्रपटात राधिका आपटे आणि अशोक पाठक मुख्य भूमिकेत आहेत.  वेलिंग्टन फिल्म्सच्या ॲलिस्टर क्लार्कने फिल्मगेट फिल्म्स, सीन व्हीलन आणि फिल्म आय व्हॅस्ट यांच्या सहकार्याने याची निर्मिती केली आहे.  


कान्सच्या स्पेशल सेक्शनमध्ये चित्रपट


हा सिनेमाने आता कान्समध्ये अधिकृत एन्ट्री केली असून, कान्सच्या स्पेशल सेक्शनमध्ये या चित्रपटाला स्थान मिळालं आहे. राधिकाने सिनेसृष्टीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे आशोक पाठक हे नाव जर अत्यंत कमी लोकांना माहित असलं, तरी या अभिनेत्याने ओटीटीवर त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे.  






पंचायत फेम अभिनेत्याला मिळालं  स्थान


आशोक पाठक याने जिंतेंद्र कुमारची पंचायत या वेब सिरिजमध्ये काम केलं आहे. या सिरिजमध्ये त्याचा छोटा रोल होता, पण तो प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरला. सध्या राधिका आणि अशोकच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन हे करण कंधारीने केलं आहे. राधिकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर राधिका ही नुकतीच विजय सेतुपतीचा मेरी क्रिसमस या चित्रपटांत दिसली होती. 






ही बातमी वाचा : 


 


'हा बाणा धर्मांध झुंडीच्या ट्रोलींगचं नाक ठेचून पुरून उरतो', किरण मानेंनी चिन्मयला ट्रोलिंगसाठी दिला जालीम उपाय