Kiran Mane on Chinmay Mandlekar : अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. अभिनेता म्हणून कोणतीही महत्त्वाची भूमिका करतान अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. जितकं प्रेक्षक त्या भूमिकेवर प्रेम करतात तितकंच प्रेक्षक त्या भूमिकेमुळे कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातही डोकावतात. सध्या असाच काहीसा अनुभव चिन्मयला आलाय. पण त्याच्यासाठी किरण माने (Kiran Mane) यांनी केलेली पोस्ट ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 


चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने तो सध्या बराच ट्रोल होतोय. पण यावर चिन्मयच्या बायकोने म्हणजेच नेहा जोशी मांडलेकर हीने एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर किरण माने यांनी पोस्ट करत चिन्मयला देखील कानमंत्र दिला आहे. दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. 


किरण माने यांनी काय म्हटलं?


किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं की, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या नांवाखाली छुपा मुस्लीमद्वेष पसरवणार्‍या प्रोपोगंडा फिल्म्स् मध्ये मी काम करणार नाही. कितीही पैशांचं आमिष दाखवलं तरी' 'हा बाणा धर्मांध झुंडीच्या ट्रोलींगचं नाक ठेचून पुरून उरतो भावा. करून बघ. जालीम उपाय आहे.'



चिन्मयने घेतला मोठा निर्णय


चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर असं ठेवलं आहे. त्यावरुन चिन्मय बराच ट्रोल झालाय. नुकतच त्याची बायको नेहा जोशी मांडलेकर हीने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सना चोख उत्तर देखील दिलं होतं. इतकच नव्हे तर चिन्मयला काहींना पाकिस्तान किंवा आफगणिस्तानमध्ये जाण्याचा देखील सल्ला दिला होता. त्यावरुन देखील नेहाने चांगलेच खडेबोल सुनावले. चिन्मयने  त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. चिन्मयने हा व्हिडिओ शेअर करत एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. दरम्यान चिन्मयने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने तो चांगलाच ट्रोल झाला. दरम्यान आता यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचा निर्णय देखील यावेळी त्याने घेतला आहे. 


ही बातमी वाचा : 


'छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो'; ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय