कोलकाता: आयपीएलमध्ये (IPL 2024) आज 36 वी लढत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात होत आहे. आरसीबीनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  कोलकाता नाईट रायडर्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये  6 पैकी चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सात पैकी सहा सामन्यांमध्ये पराभव स्वीकरला आहे. आज दोन्ही संघ आमने सामने आल्यानंतर आरसीबीचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाची सुरुवात फिल सॉल्ट (Phil Salt) आणि सुनील नरेननं केली. सुनील नरेन आज मोठी फटकेबाजी करु शकला नाही. मात्र, ईडन गार्डन्सवर फिल सॉल्टचं वादळ पाहायला मिळालं. फिल सॉल्टनं 14 बॉलमध्ये 48 धावा केल्या. 


फिल सॉल्टच्या विकेटमुळं ट्रेविस हेड अन् मॅक्गर्कचे विक्रम तुटता तुटता राहिले


आयपीएलमध्ये काल झालेल्या सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील मॅचमध्ये ट्रेविस हेड आणि जेक फ्रेजर मॅक्गर्कनं वादळी खेळी केली होती. ट्रेविस हेडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 16 बॉलमध्ये अर्धशतक झळकवलं होतं. दुसऱ्या डावात दिल्ली कॅपिटल्सकडून जेक फ्रेजर मॅक्गर्कनं 15 बॉलमध्येच 50 धावांचा टप्पा पार केला होता. मॅक्गर्कचं ते यंदाच्या आयपीएलमधील वेगवान अर्धशतक ठरलं होतं. यशस्वी जयस्वालनं 12 बॉलमध्ये अर्धशतक केलेलं असून ते आयपीएलमधील सर्वाधिक वेगवान अर्धशतक आहे. आज फिल सॉल्टकडे ट्रेविस हेड आणि मॅक्गर्कचं रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. 


फिल सॉल्ट आणि सुनील नरेनच्या जोडीनं केकेआरच्या डावाची सुरुवात केली. यापूर्वीच्या मॅचमध्ये आक्रमक खेळी करणाऱ्या सुनील नरेनची बॅट आज तळपली नाही. दुसऱ्या बाजूला फिल सॉल्टनं जोरादर फटकेबाजी केली. त्यानं 3 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीनं 13 बॉलमध्ये 48 धावा केल्या. 14 व्या बॉलवर सिक्स मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. मोहम्मद सिराजनं त्याला बाद केलं. सिराजच्या बॉलिंगवर मोठा फटका मारत असताना सॉल्ट कॅच आऊट झाला. रजत पाटीदारनं त्याचा कॅच घेतला. यामुळं 14 व्या बॉलवर फिल सॉल्ट 48 धावांवर बाद झाला. परिणामी ट्रेविस हेड आणि जेक फ्रेजर मॅक्गर्कचा वेगवान अर्थशतकाचा विक्रम तुटता तुटता राहिला.  


विराट कोहलीचं सेलिब्रेशन


आरसीबीसाठी डोकेदुखी ठरणारा फिल सॉल्ट बाद होताच विराट कोहलीनं जोरदार सेलिब्रेशन केलं. फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी लगेचचं बाद झाले. 


संबंधित बातम्या :


IPL 2024 : चाहत्यांमुळंचं हार्दिक पांड्याची डोकेदुखी वाढली, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...


RCB vs KKR: रिंकू सिंगच्या त्या गोष्टीवरुन विराट कोहली नाराज; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ नक्की पाहा!