Radhe Shyam : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) अभिनीत बहुप्रतिक्षित रोमँटिक-ड्रामा ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) 11 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. मात्र, जसजशी या चित्रपटाची रिलीज डेट जवळ येतेय, तसतसे याचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. आज ‘व्हॅलेंटाईन डे’चं निमित्त साधत चित्रपटाचे नवे पोस्टर आणि छोटीशी झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.


‘राधे श्याम’च्या निर्मात्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले. यामध्ये, प्रभासचे पात्र ‘विक्रमादित्य’ आणि पूजा हेगडेचे पात्र ‘प्रेरणा’ हिमवर्षावाचा आनंद लुटताना दिसत आहेत. याप्रसंगी यूट्यूबवर एक छोटी टीझर क्लिपही रिलीज करण्यात आली आहे. यात प्रभासच्या चित्रपटातील विविध छटा दाखवण्यात आल्या आहेत.


 







आतापर्यंत, आपण प्रभासची (Prabhas) एक रहस्यमय लव्हर बॉय 'विक्रम आदित्य' म्हणून झलक पाहिली आहे. ही झलक एका अनोख्या प्रेमकथेची गाथा सांगते. ट्रेलरमध्ये आपण पाहणार आहोत की, कथा कशी उलगडणार आहे आणि रहस्य कसे समोर येणार आहे. अशा परिस्थितीत चाहते आणि प्रेक्षक 'राधे श्याम' चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.



दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'राधे श्याम' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रभाससोबत पूजा हेडगेदेखील (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत आहे. 'राधे श्याम' हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, मल्याळम सोबत हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभासचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमारने केले आहे.


युवी क्रिएशन्स प्रॉडक्शनचा 'राधे श्याम' हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरिज यांनी सादर केला असून हा चित्रपट राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी त्याचे संपादन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली असून 11 मार्च 2022 रोजी तो सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha