In Pics : ‘आय प्रेम यु’ चित्रपटातून प्रेमाची उधळण करणार अभिजीत आमकर-कयादू लोहारची जोडी!
‘आय प्रेम यु’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनेता अभिजीत आमकर मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत अभिनेत्री कयादू लोहार मुख्य भूमिका साकारणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिजीत आणि कयादूची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'आय प्रेम यु' चित्रपटाची प्रेमकहाणी ही फक्त प्रेमकहाणी नसून प्रेमाची कहाणी आहे. मैत्री आणि अलगद तयार झालेल्या नात्यांची ही गुंतागुंत या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
अभिजीत मुख्य भूमिकेत असून, याआधी अभिजीतचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
'टकाटक', 'एक सांगायचय' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेता अभिजीत आमकरने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले.
वेगवेगळ्या फोटोशूट आणि म्युझिक अल्बममधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिला. आता लवकरच अभिजीत एका नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.