Malaika Arora , Arjun Kapoor : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही बॉलिवूडमधील चर्चात असणारी जोडी आहे.  दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आज 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं मलायकानं अर्जुन कपूरसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला मलायकानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं.  


मलायकानं अर्जुनसोबतचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये 'माइन', असं लिहून हार्टचं इमोजी शेअर केलं आहे. मलायकाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मलायकानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अर्जुन हा ब्लॅक टी शर्ट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये तर मलायका ही व्हाईट शॉर्ट्स आणि टॉप अशा लूकमध्ये दिसत आहे. 






मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते.  त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे. 


हेही वाचा :


Tejasswi Prakash , Karan Kundrra : 'बिग बॉस'च्या घरात जुळलं सूत, तेजस्वीने सांगितला करणसोबतच्या पहिल्या 'व्हॅलेंटाईन डे'चा प्लॅन


Valentine's Day 2022 : लाँग डिस्टन्स रिलेशनशिप असणाऱ्यांनी असा साजरा करा 'व्हॅलेंटाईन डे' ; पार्टनरला द्या हे सरप्राईज