Iron Man: 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'मधील (Avenger Endgame) ‘आयर्न मॅन’चा (Iron Man) मृत्यू हा चाहत्यांसाठी भावनिक क्षण होता. तेव्हापासून चाहत्यांना सतत हाच प्रश्न पडला होता की, आयर्न मॅन पुन्हा परत येईल की नाही? आयर्न मॅनची भूमिका करणाऱ्या रॉबर्ट डाउनी ज्युनियरने मार्व्हल स्टुडिओसोबतचा करार संपवला असला तरी, आयर्न मॅन परत येईल अशी चाहत्यांना अजूनही अपेक्षा होती.


आता ‘आयर्न मॅन’ अखेर परतला आहे. अखेर चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करत, मार्वल स्टुडिओने 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस'मध्ये (Doctor Strange in the Multiverse of Madness) ‘आयर्न मॅन’ला परत आणले आहे. तथापि, यात एक छोटासा ट्विस्ट देखील आला आहे. नवा आयर्न मॅन हा जुन्या आयर्न मॅनसारखा अजिबात नाही, ज्याच्याकडे असलेला विलक्षण मेंदू आणि हसण्याची क्षमता प्रेक्षकांना खूप आवडली.


 







‘हा’ आहे मोठा ट्विस्ट!


मार्वल स्टुडिओने टॉम क्रूझला (Tom Cruise)  ‘सुप्रीम आयर्न मॅन’च्या अवतारात परत आणले आहे. ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात निर्मात्यांनी ‘आयर्न मॅन सुप्रीम’ची झलक दाखवली आहे. यानंतर आता चाहत्यांनी ट्रेलर आणि कॉमिक बुकमधील काही छायाचित्रे इंटरनेटवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे.



रॉबर्ट डाउनीचे चाहते निराश!


‘सुप्रीम आयर्न मॅन’च्या लूकमध्ये टॉम क्रूझचे काही फोटोही इंटरनेटवर आले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये तुम्ही टॉम क्रूझला ‘आयर्न मॅन’च्या भूमिकेत पाहू शकता. अभिनेता टॉम क्रूझला ‘आयर्न मॅन’च्या भूमिकेत पाहून चाहते आनंदित झाले आहेत. मात्र, रॉबर्ट डाउनीचे चाहते थोडे निराश झाले आहेत. कारण करार संपला असला तरी रॉबर्ट परत येईल अशी अपेक्षा त्यांना होती.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha