Chhavi Mittal  : टीव्ही शो आणि चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर स्तनाच्या कर्करोगासोबतच्या तिच्या संघर्षाबद्दल खुलासा केला. आपण या आजाराचा सामना कसा केला हे शेअर करण्यासाठी अभिनेत्रीने एक भावनिक पोस्ट लिहिली.


या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘प्रिय स्तन.. ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी आहे. मी पहिल्यांदा तुझी जादू पाहिली, जेव्हा तू मला खूप आनंद दिलास. पण, जेव्हा तू माझ्या दोन्ही मुलांची भूक भागवलीस, तेव्हा तुझे महत्त्व वाढले. आता ही माझी वेळ आहे, तुमच्यापैकी एकजण स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असताना तुमच्या पाठीशी उभे राहण्याची... ही काही चांगली गोष्ट नाही, परंतु मला निराश होण्याची गरज नाही.’



‘माहित आहे हे सोपे नाही, पण ते कठीण असणार नाही. मी कदाचित पुन्हा पूर्वीसारखी दिसणार नाही, पण त्यामुळे मला काही वेगळे वाटण्याची गरज नाही. स्तनाच्या कर्करोगातून वाचलेल्यांसाठी खूप आनंद आहे.. तुमच्याकडून आज मला किती प्रेरणा मिळतेय, याची तुम्हाला कल्पना नाही.’


अभिनेत्री आई पुढे म्हणाली की, ‘आणि तुमच्यापैकी ज्यांना आधीच माहित आहे त्यांच्यासाठी, तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तुम्ही केलेला प्रत्येक कॉल, तुम्ही पाठवलेले संदेश, माझ्यापर्यंत पोहोचण्याची तुमची प्रत्येकाची इच्छा कौतुकास्पद आहे.’


या पोस्टनंतर छवीचे चाहते आणि मित्रपरिवार तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेता करण व्ही ग्रोव्हरने हार्ट इमोजीसह लिहिले, ‘शक्तीचे मूर्त रूप. तुमच्या प्रत्येक पावलावर आणि प्रत्येक मार्गावर, तुम्हाला जे काही हवे आहे, ते मिळावे.’


अभिनेता अर्जुन बिजलानी यानेही आपल्या शुभेच्छा पाठवल्या. तो म्हणाला, ‘एकदा लढणारा नेहमीच लढतो. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर शक्ती देवो.’ अभिनेत्रीन छवी मित्तलने पती मोहित हुसैन यांच्यासह डिजिटल उत्पादन कंपनी ‘शिट्टी आयडियाज ट्रेंडिंग’ची (SIT) सह-स्थापना केली आहे.


हेही वाचा :