KFG Chapter 2 IMDb Rating : रॉकिंग स्टार यशच्या (Yash) ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते दमदार अॅक्शन सीक्वेन्स आणि रॉकी भाईचे दमदार संवाद चाहत्यांना खूप आवडत आहेत. एकीकडे KGF 2 (हिंदी) हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला, तर दुसरीकडे या चित्रपटाने आता IMDb वरही आपली जादू दाखवली आहे. चित्रपटाला IMDb वर जबरदस्त रेटिंग मिळाले आहे.


KGF Chapter 2ला 9.7 रेटिंग मिळाले आहे. सरासरी 42 हजार मतांच्या आधारे हे रेटिंग घेण्यात आले आहे. DNA मधील अहवालानुसार, IMDb वर भारतीय चित्रपटासाठी हे सर्वोच्च रेटिंग आहे. KGF 2 ने Jr NTR- राम चरणचा ‘RRR’ आणि सुर्याच्या ‘जय भीम’लाही मागे टाकले आहे.


बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई!


KGF 2 ची मोठी लाट बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 53.95 कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे, चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 46.79 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 100.74 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला हा चित्रपट 185 कोटी रुपयांची कमाई करू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. त्याचवेळी, चित्रपटाने भारतात दोन दिवसांत एकूण 240 कोटींचे एकूण कलेक्शन केले आहे.


KGF 2 वर कोणता OTT रिलीज केला जाईल


KGFचा पहिला भाग OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज झाला आहे. आता KGF Chapter 2 देखील याच OTT वर रिलीज होणार आहे. होय, चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, KGF 2 थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर अवघ्या आठ आठवड्यांनंतर ऑनलाईन स्ट्रीम केला जाईल. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. चाहते RRR च्या OTT रिलीजची देखील वाट पाहत आहेत.


हेही वाचा :