Pushpa 2 Worldwide Collection: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2: द रूल'नं (Pushpa 2: द रूल) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुरळा उडवला आहे. सुकुमार दिग्दर्शित पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत पाहायला मिळतात. चित्रपटानं ओपनिंग डेला वर्ल्डवाईल्ड 294 कोटींचा गल्ला जमवलेला. अशातच आता रिलीजच्या फक्त सहाच दिवसांत पुष्पाच्या स्टारडमनं फक्त देशातच नाहीतर वर्ल्डवाईल्ड बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. रिलीजच्या सहा दिवसांत पुष्पा 2 नं वर्ल्डवाईल्ड 1000 कोटींचा आकडा पार केला आहे. आता फक्त भारतच नाहीतर जगभरात पुष्पा 2 चा डंका आहे, हे स्पष्ट झालं आहे. 


सोशल मीडियावर पुष्पा 2 च्या ऑफिशियल पेजनं वर्ल्डवाईल्ड 1000 कोटींच्या कलेक्शनची पोस्ट रिट्वीट केलं आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय की, "#Pushpa2 ने फक्त 6 दिवसांत एक हजार कोटींची वर्ल्डवाईल्ड कमाई केली आहे. एक आणखी ऑल टाईम रेकॉर्ड!!" या चित्रपटानं रिलीजच्या 5 दिवसांत 922 कोटींच्या कमाईचा टप्पा गाठला आणि हा विक्रम गाठणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. 






बाहुबलीच्या रेकॉर्डचा चक्काचूर 


बाहुबलीनं 10 दिवसांत 1000 कोटींचा आकडा पार केला होता. आतापर्यंत बाहुबली 2 हा सर्वात जलद 1000 कोटींची कमाई करणारा चित्रपट होता. पण आता हा विक्रम पुष्पा 2 नं मोडला आहे. बाहुबलीनंतर एसएस राजामौलीचा आरआरआर या यादीत आहे. ज्यानं 16 दिवसांत ही कमाई केली होती. तर शाहरुख खानच्या जवानला 1000 कोटींची कमाई करण्यासाठी 18 दिवस लागले.


पुष्पा 2 च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या दिवशी 294 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 449 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 621 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 829 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 922 कोटी रुपये कमावले आहेत. आणि सहाव्या दिवशी कलेक्शन 1000 कोटींहून अधिक झाले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 नं आत्तापर्यंत भारतात 645.95 कोटी रुपये जमा केले आहेत.   


फहद फासिलनं या चित्रपटात पोलीस अधिकारी भंवर सिंह शेखावत यांची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुन पुन्हा एकदा रक्तचंदनाचा तस्कर पुष्पा राजच्या भूमिकेत दिसला आहे. तर, रश्मिकानं श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे.             


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


बॉलिवूडचा सुपरफ्लॉप हिरो, ज्यानं साऊथमध्ये दिल्या 14 हिट फिल्म्स, 90s मध्ये हादरवलेलं अमिताभ बच्चनचं स्टारडम; आज 1650 कोटींच्या साम्राज्याचा मालक