Shani Sadesati 2025 : सध्या शनिदेव (Shani 2025) स्वतःच्या राशीत, म्हणजेच कुंभ राशीत स्थित आहे. नवीन वर्षात 29 मार्च 2025 रोजी शनि आपली राशी बदलत आहे. शनिदेव 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहेत. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे भ्रमण करतो. यानुसार शनि आता पुढची अडीच वर्षं मीन राशीत राहील, यामुळे अनेक राशींवरील साडेसाती आणि महादशा संपेल. नवीन वर्ष 2025 मध्ये 3 राशींवर शनीची साडेसाती राहील, तर 2 राशींवर शनीची महादशा राहील.
2025 मध्ये या राशींवर राहणार शनीची साडेसाती
सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती चालू आहे. 2025 मध्ये शनि मीन राशीत प्रवेश करताच, मकर राशीच्या लोकांवर सुरू असलेली साडेसाती समाप्त होईल आणि मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होईल. त्याचवेळी मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. नवीन वर्ष 2025 मध्ये कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरू होईल.
नवीन वर्षात या राशींवर राहणार शनीची महादशा
सध्या शनीच्या महादशेचा प्रभाव कर्क आणि वृश्चिक राशीवर दिसत आहे, कारण शनिदेव कुंभ राशीत आहे. पण जेव्हा शनि मीन राशीत प्रवेश करेल, तेव्हा या राशींवरील शनीची महादशा संपेल. 2025 मध्ये सिंह आणि धनु राशीवर शनीच्या महादशेचा प्रभाव सुरू होईल.
शनीची साडेसाती टाळण्याचे उपाय (Shani Sade Sati Remedies)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची साडेसाती आणि महादशेचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही खास उपायांचं पालन केलं पाहिजे.
- 2025 मध्ये किमान 11 शनिवारी शनि मंदिरात जाऊन आपली सावली दान करा.
- शनिदेवाशी संबंधित वस्तू जसे की काळी छत्री, बूट, चप्पल, लोखंड, तीळ इत्यादी दान करा.
- सफाई कामगार, गरीब कामगार वर्ग आणि निम्नवर्गीयांना काही गरजेच्या गोष्टी दान करा.
- रोज हनुमान चालिसा आणि बजरंग बाणाचं पठण करा.
- दारू पिऊ नका, खोटे बोलू नका किंवा रागावू नका. दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजर टाकू नका आणि आपले कर्म नेहमी शुद्ध ठेवा.
- पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुपाचा दिवा लावा.
- रोज काळ्या कुत्र्याला, कावळ्याला आणि गायीला भाकरी खायला द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: