Flop Hero Who Delivered 14 Hits: बॉलिवूड (Bollywood Movies)... इथं काम करण्यासाठी नाही म्हटलं तरी दररोज हजारो लोक मुंबईत (Mumbai News) येतात. त्यातल्या काहींचं नशीब उजळतं, तर काहींच्या नशीबाचे तारे चमकतच नाहीत. असंच काहीसं बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या एका स्टारसोबतही झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानं बॉलिवूड डेब्यू केला खरा, पण सुपरस्टारचा (Bollywood Superstar) टॅग काही त्याला घेता आला नाही. पण, त्यानं बॉलिवूड सोडलं आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत (South Cine Industry) नशीब आजमावलं. साऊथमध्ये मात्र, या स्टारचं नाणं खणखणीत चाललं. काही दिवसांतच हा स्टार चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. पुढच्या काही दिवसांत सुपर हिरो बनला आणि त्याला मेगा स्टार म्हटलं जाऊ लागलं. आज या अभिनेत्याची एकूण संपत्ती एक हजार कोटींहून अधिक आहे. तर त्याच्या कुटुंबाच्या एकत्रित संपत्तीबाबत बोलायचं झालं तर, 4 हजार कोटी असल्याचं सांगितलं जातं.
सुपरस्टार, मेगा स्टार अशा उपाध्या ज्यांना देतोय, तो दुसरा-तिसरा कुणी नसून मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi). बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी आलेल्या चिरंजीवीनं तीन चित्रपट केले. पण, ते एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले. त्यानंतर मात्र, हा सुपरस्टार जेव्हा साऊथ सिनेमांकडे वळला तेव्हा त्यानं चाहत्यांची मनं जिंकली आणि आपलं स्टारडम बनवलं. 90 च्या दशकात चिरंजीवीनं अनेक हिट चित्रपट दिले. एककाळ असा होता की, त्यावेळी चिरंजीवीची तुलना अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली जाऊ लागली होती. त्याकाळी चिरंजीवीची गणना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये होऊ लागली.
चिरंजीवीनं 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि त्यांच्या अभिनयासाठी 10 फिल्मफेअर आणि चार नंदी पुरस्कार जिंकलेत. 2022 मध्ये, चिरंजीवीला भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 14 बॅक टू बॅक हिट्स देऊन चिरंजीवी 90 च्या दशकातील सुपरस्टार बनला. तसेच, त्याकाळात चिरंजीवी एका चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त मानधन घ्यायचा. द वीक मॅग्झिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्याकाळी बिग बींना फी म्हणून 1 कोटी रुपये मिळत होते, तर चिरंजीवीला एका चित्रपटासाठी 1.25 कोटी रुपये मिळत होते. निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर चिरंजीवीची एकूण संपत्ती 1650 कोटी रुपये आहे. तर त्याच्या संपूर्ण कोनिडेला कुटुंबाची एकूण संपत्ती 4000 कोटी रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :