Pushpa 2 BO Collection Day 4 Worldwide: अल्लू अर्जुनच्या स्टारडमचा जगभरात डंका, भल्याभल्या स्टार्सना फुटला घाम; 'पुष्पा 2' फक्त चार दिवसांत 800 कोटी पार
Pushpa 2 Box Office Collection Day 4 Worldwide: 'पुष्पा 2: द रूल'नं जगभरात धुरळा उडवला आहे. चित्रपटानं रिलीजच्या चार दिवसांतच 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता लवकरच चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 4 Worldwide: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) नं जगभरात धुरळा उडवला आहे. वर्ल्ड वाईल्ड बॉक्स ऑफिसवर पुष्पाची त्सुनामी आली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुष्पा 2 नं जागतिक बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक ओपनिंग केली होती. त्यानंतर आता अनेक विक्रम पुष्पा 2 नं रचले आहेत. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अनेक नवे बेंचमार्क स्थापित केले आहेत आणि जगभरात प्रचंड नफा कमावला आहे. 'पुष्पा 2: द रुल' नं चार दिवसांत जगभरात किती कलेक्शन केलं? सविस्तर जाणून घेऊयात...
'पुष्पा 2: द रुल'नं चार दिवसांत जगभरात किती कमाई केली?
'पुष्पा 2: द रुल' हा त्या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. पहिल्याच दिवशी विक्रमी आगाऊ बुकिंग झालं, यावरून या चित्रपटाची क्रेझ लक्षात येते. हा ॲक्शन थ्रिलर रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच देशातच नव्हे तर जगभरात खळबळ माजवत आहे. या चित्रपटाला एवढा उदंड प्रतिसाद मिळत आहे की, निर्मातेही आश्चर्यचकित झाले आहेत. चित्रपटानं आपलं भांडवलं फक्त चार दिवसांतच जमा केलं आहे. जगभरात या चित्रपटानं रिलीजच्या चार दिवसांत 800 कोटींचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. आता लवकरच चित्रपट एक हजार कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे.
ट्रेड रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 थिएटरमध्ये एक आठवडा पूर्ण होण्यापूर्वी अगदी सहज 1,000 कोटी रुपये कमावेल. ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा 2 नं त्याच्या सुरुवातीच्या आठवड्याच्या शेवटी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 800 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुष्पा 2 साठी हा एक अभूतपूर्व टप्पा आहे, कारण चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
#Pushpa2TheRule is now in cinemas near you. pic.twitter.com/PH7BNhazhK
— Allu Arjun (@alluarjun) December 4, 2024
'पुष्पा 2: द रुल'नं चार दिवसांत अनेकांना पाणी पाजलं
'पुष्पा 2: द रुल'नं चार दिवसांत जगभरात 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटानं गदर 2 च्या जगभरातील लाईफटाईम कलेक्शन 686 कोटी रुपये, बाहुबलीचे 650 कोटी रुपये, सालारचे 617.75 कोटी रुपये आणि पीकेचे 792 कोटी रुपयांच्या कमाईला फक्त चार दिवसांत मागे टाकलं.
#Pushpa2TheRule has crossed ₹ 800 Crs at the WW Box office in 4 days.. 🔥
— Ramesh Bala (@rameshlaus) December 8, 2024
'पुष्पा 2: द रुल'ची चार दिवसांत देशात किती कमाई?
'पुष्पा 2: द रुल' तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं रिलीजच्या चार दिवसांत देशांतर्गत बाजारपेठेत सर्वाधिक वेगानं 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. Saknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' नं रिलीजच्या चौथ्या दिवशी सर्व भाषांमध्ये 141.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. यासह चित्रपटाची चार दिवसांत एकूण कमाई 529.45 कोटी रुपये झाली आहे. यासोबतच या चित्रपटानं गदर 2 (525.45 कोटी), बाहुबली (421 कोटी) आणि सालार सीज फायर पार्ट 1 (406.45 कोटी) चे आजीवन कलेक्शन रेकॉर्ड देखील मोडले आहेत.
दरम्यान, सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित, पुष्पा 2: द रुल मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. जगदीश प्रताप बंदरी, अनसूया भारद्वाज, सुनील, राव रमेश आणि जगपती बाबू या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरातील 10,000 पेक्षा जास्त स्क्रीनवर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :